जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या गावात शिवजयंती उत्साहात साजरी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय युवकांसाठी चिरंतन स्फुर्तीस्थान आहेत असे प्रतिपादन शिवचरित्रकार प्रशांत टेके पाटील यांनी कोपरगाव तालुक्यातील संवत्सर या ठिकाणी एका कंर्यक्रम प्रसंगी बोलताना केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिव जयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे.हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो.या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते.कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे नुकतीच ३९१ वी शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्या वेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाचा शुभारंभ दिप प्रज्वलन व शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन झाला.या कार्यक्रमास अनेक मान्यवरांसह शिवप्रेमी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी शिवचरित्रकार प्रशांत टेके पाटील यांनी शिवचरित्रातील अनेक पैलूंचा उलगडा विस्तृतपणे धारदार आवाजात केला.त्यामध्ये प्रामुख्याने शिवछत्रपतीच्या कार्यकाळाच्या पुर्वीची भयावह व अतोनात अत्याचाराने पिडीत तत्कालीन महाराष्ट्राच्या परिस्थितीचे विवरण,शिवनेरी किल्ल्यावर साजरा झालेला दैदिप्तीमान शिवजन्मोत्सव,राजमाता जिजाऊ साहेबांनी बालशिवबांवर केलेले प्रेरणादायी संस्कार,हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ,राझ्यांच्या अत्याचारी पाटलाचा चौरंगा,अफजलखाना वध,शाहास्थाखानाची फजिती आदी प्रमुख प्रसंगासह छत्रपती शिवरायांच्या जिवनात घडलेले अनेक छोट्यामोठ्या प्रसंगाचे यथोचित मांडणी यावेळी केली.तसेच शिवभक्त युवकांनी शिवजन्मोत्सवा निमित्ताने शिवछत्रपतींना अभिप्रेत असलेले विचार आचरणात आणण्याचा संकल्प करावा असे आवाहन शिवचरित्रकार प्रशांत टेके पाटलांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close