सण-उत्सव
कोपरगाव तालुक्यात…या दैवताची यात्रा उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
गोधेगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मौजे आपेगाव येथे म्हसोबा यात्रा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
कोरोना,डेल्टा पल्स आणि आता कोरोना ओमिक्रॉन अशा विविध व्हेरिएंटमध्ये कोरोनाचा फैलाव होत होता.त्यामुळे जिल्ह्यातील यात्रा,उरूस,जत्रा, माही रद्द करण्याचे आदेश शासनाने दिले होते.यंदा कोरोना रुग्ण कमी होत आहेत.त्यामुळे यात्रा होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.राज्यात सर्व जिल्ह्यात यात्रा व जत्रांना सुरुवात झाली आहे.
नगर जिल्ह्यासह राज्यात आणि देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत होते.कोरोना,डेल्टा पल्स आणि आता कोरोना ओमिक्रॉन अशा विविध व्हेरिएंटमध्ये कोरोनाचा फैलाव होत होता.त्यामुळे जिल्ह्यातील यात्रा,उरूस,जत्रा, माही रद्द करण्याचे आदेश शासनाने दिले होते.यंदा कोरोना रुग्ण कमी होत आहेत.त्यामुळे यात्रा होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.राज्यात सर्व जिल्ह्यात यात्रा व जत्रांना सुरुवात झाली आहे. यात्रा व जत्रांमध्ये किती लोकांचा सहभाग असावा,याचे नियोजन ज्या त्या ग्रामपंचायतींना करावे लागणार आहे.गावातील यात्रांसारख्या कार्यक्रमाला ५० लोक उपस्थित ठेवता येणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते मात्र त्यात आता बदल करून राज्य सरकारने आता सर्वच यात्रा महोत्सव सुरू करण्यात सरकारने हिरवा झेंडा दाखवला आहेत.त्याला कोपरगाव तालुकाही अपवाद नाही कोपरगाव तालुक्यातील आपेगावात नुकताच म्हसोबा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
या यात्रेचे वैशिट्ये म्हणजे गावातील हनुमान मंदिरापासून ते म्हसोबा मंदिरापर्यंत भव्य रथाची मिरवणूक विद्युत रोषणाई व फटाक्यांच्या आतषबाजीत काढली जाते. यावर्षीचा रथाचा मान हा मणकर्णाबाई भागवत खिलारी व राजेंद्र भागवत खिलारी यांनी घेतला होता.
सदर यात्रेनिमित्त अंबादास पाटोळे,भास्कर पाटोळे, रामभाऊ खीलारी,शिवनाथ खिलारी,सचिन मलिक , संतोष खिलारी यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी भाविक भक्त उपस्थित होते.अनेक भाविकांनी ग्रामदैवताच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे।