
स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभर विविध सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा झाली असताना वाकडी येथील युवकांनी मात्र ही जयंती एका अपघातात जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी आर्थिक मदत करून नाविन्यपूर्ण उपक्रमाने साजरी केल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राहाता तालुक्यातील वाकडी येथील विध्यार्थी अभिजीत रंधे यांचे दुचाकीवरून बाहेर गावी जात अपघात झाला या अपघात मध्ये त्याच्या डोक्याला व हनुवटीला जास्त मार लागल्याने उपचार साठी ०२ लाख च्या पुढे खर्च असल्याचे डॉक्टरानीं सांगितले होते.अभिजित रंधे यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे एवढी रक्कम जमा करणे अवघड असल्याने कुटुंब हताश झाले होते. अशातच अभिजीत रंधे यांच्या मित्र परिवाराने काही रक्कम जमा केली तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब कोते यांच्या संकलनेतून शिवजयंती उत्सवाची रक्कम देखील अभिजित रंधे यांच्या उपचारसाठी त्यांच्या वडिलांकडे सुपूर्त करण्यात आली आहे.अपघातग्रस्त अभिजित रंधे यांच्या उपचारसाठी मित्र परिवार व काही दानशूर व्यक्तींनी जी मदत केली त्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
यासाठी मा ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब कोते, निलेश लहारे,भाऊसाहेब लहारे,केतन लहारे,धनंजय लहारे,महेश जाधव,राजू तांबोळी,भारत लहारे,अशपाक तांबोळी आदिसह शिवमहोत्सवं ग्रुपचे सहकार्य लाभले.