जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विधी व न्याय विभाग

कोपरगावातील ‘त्या’ गुंडास कोपरगावात राहण्यास प्रतिबंध

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील १०५ हनुमान नगर या उपनगरातील रहिवासी असलेल्या महिला आणि मुलीला आपल्या अंगणातील पाणी झाडून लोटत असताना त्याला त्याच भागातील आरोपी अमजद जाफर मन्यार, व अन्य पाच जणांनी लोखंडी गजाने मारहाण व त्यांच्याशी असभ्य वर्तन केल्या प्रकरणी आज प्रमुख आरोपीस त्याची तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने कोपरगाव शहर पोलिसांनी आज प्रथम वर्ग न्यायालयासमोर जामीन अर्जावर सुनावणीसाठी हजर केले असता त्यातील प्रमुख आरोपीस न्यायमूर्ती एस.ई.डोईफोडे एक महिना जामिनावर सुटल्यावर कोपरगाव शहरात राहण्यास प्रतिबंध व आठवड्यातील एक दिवस तपासी अंमलदारासमोर हजेरी व आवश्यक वाटेल तेंव्हा सहकार्य करण्याचे आदेश दिल्याने या गुन्हेगारांना चांगलाच चाप बसण्यास मदत होणार आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला व आरोपी अमजद मन्यार यांचे घर शेजारी-शेजारीच आहे.दि.२६ ऑगष्ट रोजी भर दुपारी ०४ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला व महिलेची मुलगी हि त्यांचे अंगण झाडत असताना त्यांच्या हातातील झाडूच्या सहाय्याने पाणी लोटीत असताना त्याचा आरोपीस राग येऊन त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून आरोपी अहमद मण्यार याने त्याच्या हातातील लोखंडी गजाच्या सहाय्याने फिर्यादी माहिलेच्या उजव्या हातावर व पायावर मारून जखमी केले व आरोपी अमजद मनियार,रुबीना समजत मणियार,उजमा मनियार,जेबिन जरा मनियार,सोनू जलार मणियार यांनी फिर्यादीची मुलगी हिला लाथा बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून दमदाटी केली.व आरोपी अहमद मण्यार याने चित्रपटातील दृष्यास लाजवेल अशा रीतीने फिर्यादी महिलेच्या साडीस हात घालून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप केला आहे.या बाबत फिर्यादी महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या घटनेत फिर्यादी महिलेची मुलगी हि जखमी झालेली आहे.या प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीस जेरबंद केले असता त्यांना प्राथव वर्ग न्यायदंडाधिकारी क्रं.२ समोर हजर केले असता त्यातील प्रमुख आरोपी अहमद मण्यार यास दि.२७ ऑगष्ट रोजी ३० तारखे पर्यंत पोलीस कोठडी सूनावली होती तर अन्य आरोपीस न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.दरम्यान प्रमुख आरोपीची आज पोलीस कोठडी संपली होती.कोपरगाव शहर पोलिसांनी त्यास कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री एस.ई.डोईफोडे यांच्या समोर हजर केले असता आरोपीच्या वतीने अड्.नितीन गंगावणे यांनी बाजू मांडली तर सहाय्यक सरकारी अभियोक्ता सोमनाथ व्यवहारे यांनी या आपदग्रस्त महिला व मुलीची बाजू मांडली होती.न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकूण प्रमुख आरोपी अहमद मन्यार यास “एक महिना जामिनावर सुटल्यावर कोपरगाव शहरात राहण्यास प्रतिबंध व आठवड्यातील दोन दिवस तपासी अंमलदारासमोर हजेरी व आवश्यक वाटेल तेंव्हा सहकार्य करण्याचे आदेश” दिल्याने या महिलेला व मुलीस न्याय मिळण्यास मदत होणार आहे.व अपप्रवृत्तीस चाप बसणार आहे.याबाबत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनीही या आपदग्रस्त महिलेची व मुलीची बाजू उचलून धरली होती.तर इतर वेळी महिलांचा कळवळा दाखविणाऱ्या अन्य राजकीय नेत्यांनी मात्र सोयीस्कर रित्या मौन पाळले होते.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.जी पवार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close