कोपरगाव तालुका
कोपरगावात क्रीडा दिन उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वस्त संदीप रोहमारे हे होते.
क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक वर्षी देशात 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरी करण्यात येते.कोपरगावात के.जे.सोमय्या महाविद्यालयात हा क्रीडादिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
या प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,संस्थेचे सचिव ऍड.संजीव कुलकर्णी,संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,कार्यालयीन अधीक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उप-प्राचार्य बी.आर.सोनवणे,जिमखाना समितीचे चेअरमन जी.एन.डोंगरे,एस.बी.जगझाप,डी.एस.बुधवंत व शारीरिक शिक्षक एम.व्ही.कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुष्पहाराने पूजन करण्यात आले.प्रमुख पाहुण्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या चारित्र्याविषयी सविस्तर माहिती सांगितली व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदानावरही प्रकाश टाकला.सदर कार्यक्रम प्रसंगी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.जिमखाना समिती अध्यक्ष यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.