गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात तरुणीची आत्महत्या,सासरच्या मंडळींचा छळाचा आरोप
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीत सासर तर नाशिक येथे माहेर असलेल्या शीतल अनिल कांबळे (वय-१९) या तरुणीने आपल्याच राहत्या घरात आज सकाळी ०६ वाजे पूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.या प्रकरणी माहेरकडच्या मंडळींनी,”आमच्या मुलीचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा” आरोप केल्याने याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान या महिलेचे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करून दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात टाकळी येथे अंत्यविधी करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
लग्नानंतर सुरुवातीचे नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर या तरुणीला काही दिवसात दोन अपत्ये झाली.मात्र दोन्हीही मुलीचं असल्याने सासरची मंडळी नाराज होती.त्यावरून त्यांच्यात कुरबुर सुरु होती.त्या बाबत तिने वेळोवेळी याबाबत माहेर असलेल्या आपल्या नातेवाईकांकडे त्याची कल्पना दिली होती अशी माहिती समजते.मात्र आज दि.३१ ऑगष्ट रोजी सकाळीच या तरुणीचा मावसभाऊ आकाश धनराज यशोद यास सासरच्या लोकांनी फोन करून,”तुमची बहीण गंभीर आजारी असून निघून येण्यास फर्मावले होते.मात्र घटनास्थळी हि तरुणी गळफास घेऊन मृत झालेली आढळली आहे.
सदरचे सवित्तर वृत्त असे की,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकळी ग्रामपंचायत हद्दीत सासर असलेल्या शीतल कांबळे या तरुणीचे सन-२०१६ साली वाजत-गाजत टाकळी येथील तरुण अनिल राजेंद्र कांबळे यांचेशी लावून देण्यात आले होते.या कुटुंबात सासू,नवरा,दीर,जावं असे सदस्य आहेत.सुरुवातीचे नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर या तरुणीला काही दिवसात दोन अपत्ये झाली.मात्र दोन्हीही मुलीचं असल्याने सासरची मंडळी नाराज होती.त्यावरून त्यांच्यात कुरबुर सुरु होती.त्या बाबत तिने वेळोवेळी याबाबत माहेर असलेल्या आपल्या नातेवाईकांकडे त्याची कल्पना दिली होती अशी माहिती समजते.मात्र आज दि.३१ ऑगष्ट २०२१ रोजी सकाळीच या तरुणीचा मावसभाऊ आकाश धनराज यशोद यास सासरच्या लोकांनी फोन करून,”तुमची बहीण गंभीर आजारी असून तुम्ही ताबडतोब टाकळी या ठिकाणी निघून या व तिच्या माहेरी हा निरोप सांगा” असा निरोप सांगितला. त्या प्रमाणे आकाश यशोद याने हि माहिती ‘त्या’ तरुणीच्या माहेरी दिली.व ते सर्व आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास आले असता त्यांना येथे मुलगी मयत असल्याची धक्कादायक माहिती मिळाल्याने त्यांना धक्का बसला.सदर मयत महिलेस कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता वैद्यकीय अधिकांऱ्यानी तिला मृत घोषित केले आहे.तिचे शव विच्छेदन करून तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास तिच्यावर मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात या मृत महिलेच्या नातेवाईकांचा आक्रोश आमच्या प्रतिनिधीस पाहावयास मिळाला असून कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी त्या ठिकाणी कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून मोठा बंदोबस्त ठेवलेला दिसून आला आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी या महिलेची अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी करीत आहेत.दरम्यान या प्रकरणी मुलीच्या माहेरची मंडळी या मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्याला पोलीस सूत्रांनी दुजोरा दिला आहे.