जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
वन्य जीव

पुन्हा आढळले तीन बिबटे,कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांत भीती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जवळके नजीक असलेल्या धोंडेवाडी येथील शेतकऱ्याच्या शेतात रांजणगाव देशमुख-देर्डे कोऱ्हाळे रस्त्याच्या लगत असलेल्या विहिरीत रात्रीच्या सुमारास मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात बिबट्या पडला असतानाही घटना ताजी असताना पुन्हा एकदा त्याच ठिकाणच्या उत्तरेस एक कि.मी.अंतरावर तीन बिबटे रात्रीच्या सुमारास आढळून आले आहे.त्यामुळे जवळके आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

बिबट्या हा मुख्यत्वे जंगलातच राहणे पसंत करतो.मात्र अलीकडील काळात त्याचे खाद्य दुर्मिळ होत असल्याने तो मनुष्य वस्तीत घुसताना आढळत आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील जवळके नजीक असलेल्या धोंडेवाडीत मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात उघडकीस आली होती.तेथील पुंजाहारी नेहे वस्ती जवळ असलेल्या विहिरीत तो भक्ष्याच्या शोधात असताना पडला होता.मात्र त्यानंतर त्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर पुन्हा एकदा तीन बिबटे ठेथील शेतकरी किरण जवरे यांना आढळले आहे.त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

बिबटे मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात व तेथील कुत्री,पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे.यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात.बिबट्या हा मुख्यत्वे जंगलातच राहणे पसंत करतो.मात्र अलीकडील काळात त्याचे खाद्य दुर्मिळ होत असल्याने तो मनुष्य वस्तीत घुसताना आढळत आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील जवळके नजीक असलेल्या धोंडेवाडीत मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात उघडकीस आली होती.तेथील पुंजाहारी नेहे वस्ती जवळ असलेल्या विहिरीत तो भक्ष्याच्या शोधात असताना पडला होता.त्यानंतर वनींकरण विभागाच्या अधीकारी प्रतिभा सोनवणे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यास काढले होते.त्यास चार महिने उलटले नाही तोच पुन्हा एकदा रांजणगाव देशमुख र्ते देर्डे या रस्त्यावर कालर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तेथील तरुण किरण प्रल्हाद जवरे हा आपल्या ट्रॅक्टरवरून वस्तीवर जात असताना सेवा निवृत्त तारतंत्री नामदेव किसन थोरात यांच्या शेताजवळ त्यास दोन बिबटे आडवे गेले आहे.त्यामुळे त्याची घबराहट उडाली होती.

दरम्यान या शेतकऱ्याने आपला ट्रॅक्टर उभा करून मोठ्या धाडसाने आपल्या भ्रमणध्वनीच्या सहाय्याने अन्य शेतकऱ्यांना मदतीस बोलावले होते.त्यावेळी काही वेळाने सदर बिबट्या मार्गस्थ झाला आहे.त्यानंतर काही शेतकऱ्यांना मदतीस घेऊन त्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाठलाग केला असता त्या ठिकाणी थोड्या अंतरावर आणखी एक बिबट्या आढळून आला आहे.त्यामुळे त्यांची एकूण संख्या तीन आढळून आली आहे.त्यांनी त्यानंतर त्यांना विविध आवाजाच्या साहाय्याने पिटाळून लावले आहे.

दम्यान या घटनेने जवळके,धोंडेवाडी,बहादरपूर,बहादराबाद,शहापूर,वेस-सोयगाव,सायाळे आदी परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुक्यातील वन विभागाने सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close