जाहिरात-9423439946
लोकसभा कामकाज

दिव्यांग शिबिरांना गती देणार-..याकेंद्रीय मंत्र्यांची माहिती

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  अहिल्यानगर जिल्ह्यात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्य शिबिर आयोजित करण्यास गती देणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांनी शिर्डीचे खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदार संघातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

खा.भाऊसाहेब वाकचौरे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य व आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याबाबत केंद्र सरकारकडून सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.यासंदर्भात सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना पत्र पाठवून माहिती दिली आहे.

   सन-२०२६ चे लोकसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारी ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत दोन टप्प्यात (पहिला टप्पा: २८ जाने – १३ फेब्रु; दुसरा टप्पा: ९ मार्च – २ एप्रिल) संपन्न होत आहे,ज्यात रेल्वे मंत्रालयासह विविध मंत्रालयांच्या अनुदानांवर चर्चा आणि अर्थसंकल्प सादर केला गेला असून त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे.त्यात शिर्डीचे खा.वाकचौरे यांनी हा प्रश्न केंद्रीय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार या मंत्र्यांना विचारला होता.

अहिल्यानगर जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य व आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याबाबत केंद्र सरकारकडून सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.यासंदर्भात सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना पत्र पाठवून माहिती दिली आहे.

  खा.वाकचौरे यांनी दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी केलेल्या पाठपुराव्याचा संदर्भ घेत मंत्र्यांनी सांगितले की,”राष्ट्रीय वयोश्री योजना (आर.व्ही.वाय.) अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात शिबिर आयोजित करण्याबाबत प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.या उपक्रमातून पात्र लाभार्थ्यांना आवश्यक सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

   यासोबतच लाभार्थ्यांना त्यांच्या जवळच्या प्रधानमंत्री दिव्याशा वयोश्री केंद्र (PMDK) मार्फत ‘वॉक-इन’ पद्धतीनेही लाभ घेता येणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र,वडगाव गुप्ता (अहिल्यानगर) येथे हे केंद्र कार्यरत असून इच्छुकांनी येथे संपर्क साधावा,असेही सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close