जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
लोकसभा कामकाज

तरुणाच्या व्यसनमुक्ती बाबत केंद्राचे धोरण काय-खा.वाकचौरे यांचा सवाल

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  देशात ३५० तर महाराष्ट्रात ४३ एकात्मिक व्यसन मुक्ती पुनर्वसन केंद्रे असून त्याअंतर्गत सन-२०२३-२४ मध्ये समुदेशन उपचार करून घेणाऱ्या रुग्णाची संख्या ०६ लाख ०६ हजार १६७ इतकी असून महाराष्ट्र राज्यातील ११ हजार ९७३ इतके रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री बी.एल.वर्मा यांनी शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिली आहे.

“अंमली पदार्थांच्या व्यसनाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना डिस्चार्ज दिल्यानंतर,त्यांच्या कुटुंबियांना आणि मुलांचे त्यांच्या घरी समुपदेशन केले जाते.विभागाने नवचेतना मॉड्यूल (शालेय मुलांसाठी जीवन कौशल्ये आणि औषध शिक्षणाची नवीन जाणीव) शिक्षक प्रशिक्षण मॉड्यूल विकसित केले आहे”-बी.एल.वर्मा,राज्य मंत्री,सामाजिक न्याय सक्षमीकरण,भारत सरकार.

  

सिगारेट ओढणे,दारू पिणे वा अन्यामादक पदार्थांचे सेवन करणे,मावा (सुगंधी तंबाखू) खाणे इत्यादींमुळे दात,घसा,फुप्फुसे,हृदय,जठर,मूत्रपिंडे तसेच श्वसनसंस्था आणि पचनसंस्था यांचे विकार होऊन कर्करोग व इतर भयंकर रोग होतात.व्यसनांचे मानसिक दुष्परिणाम : व्यसनांमुळे मन व बुद्धी अकार्यक्षम बनून मानसिक त्रास होतो. दारू हे एक व्यसन आहे.वारंवार दारू पिण्याची इच्छा हा मानसिक आजार आहे.दारूमुळे ती पिणाऱ्यांची घरे उद्ध्वस्त होतात.घरातील मुलांवर व्यवस्थित संस्कार होत नाहीत.स्रियांवर अत्याचार होतात.त्यामुळे त्यांचे जीवन असुरक्षित रहाते.व्यसनी व्यक्तीच्या जीवनावर मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होऊ शकतात.तरीही देशात मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीनता वाढत आहे.यावर सरकार या तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी काय उपक्रम राबवते ? देशात दारू आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी चालवल्या जाणाऱ्या व्यसनमुक्ती केंद्रांची राज्य निहाय माहिती काय आहे ? गेल्या पाच वर्षांत या केंद्रांमध्ये दाखल झालेल्या व्यसनाने ग्रस्त व्यक्तींची संख्या आणि सदर व्यसनाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना इतर कोणतीही आर्थिक मदत किंवा इतर मदत दिली जाते का ? याबाबतची विचारणा शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी लोकसभेत प्रश्न विचारला होता.त्यावर लेखी उत्तरात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री बी.एल.वर्मा यांनी हे उत्तर दिले आहे.

खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी.

त्यावेळी पुढे त्याने म्हंटले आहे की,” देशात ३५० व्यसन मुक्ती केंद्रे असून महाराष्ट्रांत ४३ केंद्रे असल्याची माहिती देवून गेल्या पाच वर्षात या केंद्रांचा लाभ घेतलेल्या व्यक्तींची राज्यनिहाय यादी दिली असता सन-२०२३-२४ मध्ये ०६ लाख ०६ हजार १६७ इतकी संख्या असल्याचे स्पष्ट करून महाराष्ट्रांत त्याची संख्या ११ हजार ९७३ इतकी असून उपचारा दरम्यान एकात्मिक व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्रे (IRCA) आणि जिल्हा व्यसनमुक्ती केंद्रे (DDAC) मध्ये अल्कोहोल आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना समुपदेशन सेवा पुरवल्या जात आहेत.अंमली पदार्थांच्या व्यसनाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना डिस्चार्ज दिल्यानंतर,त्यांच्या कुटुंबियांना आणि मुलांचे त्यांच्या घरी समुपदेशन केले जाते.विभागाने नवचेतना मॉड्यूल (शालेय मुलांसाठी जीवन कौशल्ये आणि औषध शिक्षणाची नवीन जाणीव) शिक्षक प्रशिक्षण मॉड्यूल विकसित केले आहे.नवचेतना नवचेतना मॉड्यूलचा उद्देश शाळांमध्ये मुलांमध्ये ड्रग्जविरुद्ध जागरूकता निर्माण करणे आणि जीवन कौशल्ये आणि ड्रग्ज शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि पालक आणि कुटुंबांसाठी ड्रग्ज शिक्षण आणि माहिती सत्रांना प्रोत्साहन देणे आहे असे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री बी.एल.वर्मा यांनी आपल्या उत्तरात शेवटी नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close