श्रीरामपूर तालुका
पंजाबी,सिंधीसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापा-…या खासदारांची मागणी

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राज्य शासनाने अनेक समाजासाठी महामंडळ स्थापन करीत आहेत त्याचप्रमाणे आता शीख,पंजाबी आणि सिंधी बांधवांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करावे अशी मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.वाकचौरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

“महाराष्ट्राचे थोर संत नामदेव हे दोन दशकांहून अधिक काळ पंजाबमध्ये राहिले आहेत.संत नामदेवांचं मूळ गाव नरसी नामदेव हे नांदेडपासून जवळच आहे.आजही शीख धर्मिय लोकं नांदेडला आल्यावर नरसी नामदेवला आवर्जून जातात.गुरू ग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवांच्या पदाचांही समावेश करण्यात आला आहे”- खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी.
शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक आणि महाराष्ट्राचा जवळचा संबंध आहे,”नांदेड वास्तव्यादरम्यानच गुरू गोविंद सिंह यांनी देहधारी गुरूंची परंपरा संपवण्याचा निर्णय घेतला होता.स्वतःनंतर गुरू ग्रंथ साहिबला प्रस्थापित करण्याचाही निर्णय त्यांनी इथंच घेतला.नांदेडमधल्या तख्त सचखंड हजूर साहिब गुरूद्वारानुसार,नांदेड इथं 7 ऑक्टोबर 1708 ला परलोकगमनाला (स्वर्गारोहण) जाण्याआधी त्यांनी हा संदेश दिला होता.”परमात्म्याच्या इच्छेनुसार मी या पंथाची स्थापना केली आहे.माझ्या सगळ्या शीख बांधवांना या ग्रंथाचं पालन करण्याचा आदेश मी देतो.या पवित्र ग्रंथावर तुमच्या गुरूसारखीच आस्था ठेवा आणि याला परमात्म्याचं एक रूपच समजा.ज्याचं मन पवित्र आहे तो या ग्रंथाच्या पवित्र शब्दांनुसार आपलं आचरण करेल”
त्याच बरोबर महाराष्ट्राचे थोर संत नामदेव हे दोन दशकांहून अधिक काळ पंजाबमध्ये राहिले आहेत.संत नामदेवांचं मूळ गाव नरसी नामदेव हे नांदेडपासून जवळच आहे.आजही शीख धर्मिय लोकं नांदेडला आल्यावर नरसी नामदेवला आवर्जून जातात.गुरू ग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवांच्या पदाचांही समावेश करण्यात आला आहे.या शिवाय आज महाराष्ट्रात मोठ्या संख्येने शीख,पंजाबी,सिंधी बांधव राहत आहेत.त्यांच्या हित संवर्धनार्थ हे महामंडळ स्थापन करणे गरजेचे आहे.
त्यामुळे याबाबत श्रीरामपूर येथील शीख पंजाबी आणि सिंधी बांधवांनी मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेले असून त्याची प्रत खा.वाकचौरे यांना प्राप्त झाले आहे.त्यामुळे त्यांनी ही मागणी केली आहे.त्यात त्यांनी शिख व जैन समाजाचा समावेश अल्पसंख्याक महामंडळात समावेश करण्यात आलेला होता पण तद्नंतर जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात आले असून त्याच शीख पंजाबी आणि सिंधी बांधवांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे अशी मागणी केलेली असल्याने सदरची मागणी जास्त असून शीख पंजाबी आणि सिंधी बांधवांच्या विनंतीस मान देऊन स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्या साठी आग्रही मागणी शेवटी खा.वाकचौरे यांनी शेवटी या पत्राद्वारे केली आहे.