जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
महिला बालविकास विभाग

महिला दिनानिमित्त महिलांना पदाचा मान

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


जागतिक महिला दिनानिमित्त कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत येथे सरपंच संदीप देवकर यांनी गावातील महिला कल्पना लक्ष्मण मालकर यांना सरपंच तर दुसऱ्या महिला भारती बाळासाहेब देवकर यांना उपसरपंच पदाची संधी देण्यात आली होती.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  

दरम्यान गावातील महिला विजया नंदू आमले यांचा आदर्श महिला म्हणून सत्कार करण्यात आला आहे.या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

   सन -१९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय महिला कामगार संघटनेच्या परिषदेत क्लारा झेटकीन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची हाक दिली आणि तेव्हापासून दरवर्षी ०८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून भारतासह जगभर साजरा केला जातो.कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीत तो मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

  सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख,ग्रामपंचायत उपसरपंच संजय देवकर ग्रामपंचायत सदस्य शशिकांत देवकर,रूपाली मालकर,श्रीमती हिराबाई मोरे,ग्रामपंचायत अधिकारी बाबासाहेब गुंड,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका कांता देवकर,रणधीर सर,पोलीस पाटील राजेंद्र देवकर तसेच आरोग्य सेविका,अंगणवाडी सेविका,आशा सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी व इतर गावातील महिला उपस्थित होत्या.

  दरम्यान एक दिवसीय महिला सरपंच यांचा सत्कार संदीप देवकर व एक दिवसीय महिला उपसरपंच यांचा सत्कार पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर यांनी केला.दरम्यान गावातील महिला विजया नंदू आमले यांचा आदर्श महिला म्हणून सत्कार करण्यात आला आहे.या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close