मानव संसाधन विकास
पी.एम .इंटर्नशिप योजनेचा युवकांनी लाभ घ्यावा- आवाहन

न्युजसेवा
शिर्डी – (प्रतिनिधी )
दिनांक २३ जुलै २०२४ रोजी अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या पी.एम.इंटर्नशिप योजनेचा (पीएमआयएस) उद्देश तरुणांना इंटर्नशिपच्या संधीचा लाभ युवकांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी नुकतेच एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

दरम्यान या पायलट प्रोजेक्टच्या या टप्प्यात ३२७ कंपन्यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ७३५ जिल्ह्यांमध्ये १.१८ लाखांहून अधिक इंटर्नशिप संधी पोस्ट केल्या आहेत.त्यापैकी सुमारे ३७,००० संधी पदवीधरांसाठी तर २३,००० आय.टी.आय.धारकांसाठी,१८,००० डिप्लोमा धारकांसाठी,१५,००० उच्च माध्यमिक उत्तीर्णांसाठी आणि २५,००० हायस्कूल उत्तीर्ण उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.
पंतप्रधान इंटर्नशिप योजना ही एक सरकारी योजना आहे,जी तरुणांना बारा महिन्यांसाठी देशातील टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देते.या योजनेचा मुख्य उद्देश २१ ते २४ वर्षांच्या वयोगटातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील तरुणांना व्यावहारिक अनुभव मिळवून देणे आणि त्यांच्या करिअरच्या संधी वाढवणे असा मानला जात आहे.
यात तरुणांना दर महिन्याला ०५ हजार रुपये स्टायपेंड (संवर्धनासाठी आर्थिक मदत) दिली जाते.यात देशातील टॉप ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळत असते.

दरम्यान खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हंटले आहे की,”यात पूर्णवेळ शिक्षण किंवा पूर्णवेळ नोकरी नसलेल्या २१-२४ वयोगटातील तरुणांसाठी १.२५ लाख इंटर्नशिप प्रदान करण्याचे उद्दिष्ट असलेला हा एक पायलट प्रोजेक्ट आहे.हा दिनाक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू करण्यात आला आहे.या प्रोजेक्ट अंतर्गत,प्रत्येक इंटर्नला मासिक भत्ता म्हणून ५००० रुपये आणि एक वेळ अनुदान म्हणून ६००० रुपये मिळतील.शिवाय,प्रत्येक इंटर्नशिप करणाऱ्यास विमा संरक्षण प्रदान केले जाईल.योजनेचा पायलट प्रोजेक्ट www.pminternship.mca.gov.in या ऑनलाइन पोर्टल आणि सुलभ नोंदणीसाठी समर्पित मोबाइल अॅपद्वारे राबविला जात असून योजनेची सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे पोर्टलवर उपलब्ध आहेत.पायलट प्रोजेक्टचा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे आणि आतापर्यंत सुमारे १.८७ लाख अर्जदारांकडून अंदाजे ३.९८ लाख अर्ज प्राप्त झाले आहेत.
दरम्यान या पायलट प्रोजेक्टच्या या टप्प्यात ३२७ कंपन्यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ७३५ जिल्ह्यांमध्ये १.१८ लाखांहून अधिक इंटर्नशिप संधी पोस्ट केल्या आहेत.त्यापैकी सुमारे ३७,००० संधी पदवीधरांसाठी तर २३,००० आय.टी.आय.धारकांसाठी,१८,००० डिप्लोमा धारकांसाठी,१५,००० उच्च माध्यमिक उत्तीर्णांसाठी आणि २५,००० हायस्कूल उत्तीर्ण उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.त्याची अर्ज प्रक्रिया सुरू आहे आणि २२ एप्रिल २०२५ पर्यंत खुली राहील.याचा लाभ मतदार संघातील युवकांनी घ्यावा असे आवाहन शेवटी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले आहे.