मनोरंजन
“घाबरायचे नाही,लढायचे” रेखाटनाचे कौतुक
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“कोरोना” हा विषाणू सर्व प्रथम १९६० च्या दशकात सापडला. सर्वात आधी सापडलेल्यांमध्ये कोंबड्यांमध्ये एक संसर्गजन्य ब्रॉन्कायटीस विषाणू आणि सामान्य सर्दी असलेल्या दोन रुग्णांमध्ये (नंतर ह्यूमन कोरोनाव्हायरस २२ ई आणि ह्यूमन कोरोनाव्हायरस ओसी (४२)असे नाव देण्यात आले) होते. २००३ मध्ये सार्स-सी.ओ.व्ही., एचसीओव्ही एन.एल. २००४ मध्ये एच.के.यू. १, २०१२ मध्ये मेर्स-सीओव्ही आणि २०१९ मध्ये एस.ए.आर.एस.-कोव्ही -२ (पूर्वी २०१९-एन.सी.ओ.व्ही. म्हणून ओळखले जाणारे) या कुटुंबातील अन्य सदस्यांची ओळख पटली आहे. यामध्ये गंभीर श्वसनमार्गाचे संक्रमण होते.त्याचा प्रादुर्भाव नेमका कोठून होतो व त्याला नामशेष करण्याचा उपाय अद्याप शास्त्रज्ञांना सापडला नाही.त्यामुळे नागरिकांत त्या बाबत भीतीचे वातावरण आहे.त्यासाठी जनगजागृती हा सर्वात चांगला व प्रभावी उपाय मानला जातो.त्यामुळे या डॉ.सी.एम.मेहता या शाळांसारखे उपाय अन्य शाळांही अवलंबणे गरजेचे बनले आहे.