मनोरंजन
प्रेमाचा अनुभव ग्रंथातून घेता येतो-ज्येष्ठ साहित्यिक सोनवणे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
प्रेमाचा अनुभव ग्रंथातून घेता येतो. थकलेला हात मायेने डोक्यावर आला की माणूस गहिवरून जातो, त्याला प्रेमाची अनुभूती मिळते तसाच अनुभव कविता वाचून व ऐकून मिळत असल्याने कविता साहित्य आंतरमनाची एक शैली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालयात नुकतेच काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन केले होते त्या वेळी कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर. थोपटे हे होते.
सदर कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा.आर.एस. झरेकर, प्रा.डॉ.सुभाष रणधीर, प्रा.डॉ.राजाराम कानडे, प्रा.डॉ.देविदास रणधीर, प्रा.प्रकाश सावंत, प्रा.संपत आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, कविता सहज व्यक्त होणारी कला असून त्यामध्ये सागर सामावून घेण्याची क्षमता असते कवीची कल्पना संशोधकांना संशोधन करण्यास यथायोग्य मदत करते. म्हणून कविता लेखनास कमी लेखू नये. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.थोपटे म्हणाले की, कोपरगावला सांस्कृतिक वारसा लाभला आहे, त्याचे जतन करून विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध कवी होण्याचे स्वप्न पहाण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी करून दिला, सूत्रसंचलन प्रा.डॉ.कैलास महाले यांनी केले. सदर स्पर्धेचे परीक्षण प्रा.रावसाहेब दहे, प्रा.प्रकाश सावंत यांनी केले. या स्पर्धेत १२ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.उपस्थितांचे आभार प्रा.रावसाहेब दहे यांनी मानले.