आंदोलन
बाजार लिलाव बंद,व्यापारी पदाधिकारी वाद !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास व्यापाऱ्यांना सभापती साहेबराव रोहम यांनी आक्षेपार्ह शब्दाचा प्रयोग केल्याने दोन गटात मोठा वाद निर्माण झाला होता.परिणामी संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी लिलाव पुकारण्याचे काम बंद केल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती.मात्र शेवटी सचिव नानासाहेब रणशुर यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटातील वाद संपुष्टात आणला असून लिलाव पूर्ववत सुरू झाले असल्याचे दिसून आले आहे.

मागील महिन्यात संपन्न झालेल्या वार्षिक सभेत सभापती साहेबराव रोहम यांनी आपले प्रास्तविक संपवतांना थेट सभा संपल्याची घोषणा करून गदारोळ उडवून दिला होता.तर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करताना त्यांनी आपल्याच गटाच्या संचालकांना झुकते माप दिल्याने सदर वार्षिक सभेतून आ.काळे गटाने बाहेर पडून निषेध व्यक्त केला होता.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सातत्याने विविध कारणाने चर्चेत असते त्यातून अनेक वाद त्यांनी ओढवून घेतले आहे.परिणामी त्यात शेतकऱ्यांचे नुकसान होताना दिसत आहे.आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने आज लिलाव पुकारण्यास कर्मचारी नसल्याने लिलाव काही काळ बंद होते.त्यावर उपाय म्हणून सचिवांनी तेथील एका व्यापाऱ्यास लिलाव पुकारण्यास विनंती केली होती.त्या प्रमाणे लीलाल सुरू झाले होते.मात्र एका शेतकऱ्यांच्या शेतमालाचा लिलाल कमी झाल्याची तक्रार एका शेतकऱ्याने बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम यांचेकडे केली होती.त्यांनी तातडीने घटनास्थळी जावून समक्ष पाहणी करून त्या ठिकाणी असलेले व्यापारी मनीष शहा यांना काही आक्षेपार्ह शब्दांचा प्रयोग केल्याने त्यांचेसह काही व्यापाऱ्यांनी त्यास आक्षेप घेतला होता व त्या निषेधार्थ सदर लिलाव बंद केल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली होती.परिणामी जवळपास एक ते दिड तास लिलाव बंद होते.परिणामी त्याबाबत मोठी ओरड झाली होती.

“कोपरगाव तालुक्यातील व्यापारी शेतकऱ्यांना चोवीस तासात आपली देयके देत असताना त्यांना बाजार समिती बाहेरील व्यापाऱ्यांपेक्षा अतिरिक्त हमाली तोलाई,शिवाय काटलाचा भार उचलावा लागतो.तरीही आम्ही वीणा तक्रार काम करत असताना पदाधिकाऱ्यांनी आम्हाला त्रास देणे उचित नाही”- मनीष शहा,व्यापारी प्रतिनिधी,कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीला काही शेतकऱ्यांनी घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली असता आमचे प्रतिनिधीने घटनास्थळी भेट दिली असता त्या ठिकाणी लिलाव बंद झालेले आढळून आले होते.दरम्यान त्यानंतर काही वेळाने त्या ठिकाणी बाजार समितीचे सचिव रणशुर आले व त्यांनी व्यापाऱ्यांची चुकीच्या शब्द प्रयोगाबाबत दिलगिरी व्यक्त केली होती.त्यानंतर व्यापाऱ्यांनी आपले लिलाव पूर्ववत सुरू केले असल्याचे दिसून आले आहे.
मागील महिन्यात संपन्न झालेल्या वार्षिक सभेत सभापती साहेबराव रोहम यांनी आपले प्रास्तविक संपवतांना थेट सभा संपल्याची घोषणा करून गदारोळ उडवून दिला होता.तर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करताना त्यांनी आपल्याच गटाच्या संचालकांना झुकते माप दिल्याने सदर वार्षिक सभेतून आ.काळे गटाने बाहेर पडून निषेध व्यक्त केला होता.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यापारी प्रतिनिधी तथा माजी संचालक मनीष शहा यांनी,”कोपरगाव तालुक्यातील व्यापारी शेतकऱ्यांना चोवीस तासात आपली देयके देत असताना त्यांना बाजार समिती बाहेरील व्यापाऱ्यांपेक्षा अतिरिक्त हमाली तोलाई,शिवाय काटलाचा भार उचलावा लागतो.तरीही आम्ही वीणा तक्रार काम करत असताना पदाधिकाऱ्यांनी आम्हाला त्रास देणे उचित नाही असे म्हणून झाल्या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे.द
दरम्यान एका माहितीनुसार कोल्हे गटाचे वर्तमान वादग्रस्त सभापती साहेबराव रोहम यांचे दि.18 नोव्हेंबर 2025 रोजी आपला ठरल्याप्रमाणे आवर्तन संपले असून त्यांनी अद्याप आपला राजीनामा का दिला नाही असा सवाल काही शेतकऱ्यांनी विचारला आहे.आगामी काळात आ.काळे गटाचा सभापती होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.



