भारतीय रेल्वे
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे…या शहरात उत्साहात स्वागत..!

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे आगमन कोपरगाव स्थानकावर रात्री ०८ वाजता झाले.गाडीला हिरवा झेंडा दाखवून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. या सेवेमुळे विद्यार्थी,व्यापारी व पर्यटकांना जलद व सुखद प्रवासाची सुविधा मिळणार असून, वेळ व खर्च वाचणार असून आपल्या स्थानिक नागरिकांना देखील मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान इतर रेल्वे गाड्यापेक्षा या गाडीच्या तिकिटाचा दर जास्त असला तरी त्यात नाश्ता आणि जेवण प्रवाशांना रेल्वेकडून दिले जाणार आहे.वेटिंगचे कोणतेही तिकिट दिले जाणार नाही. कन्फर्म तिकिटच प्रवाशांना दिले जाणार असल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बेंगळुरू–बेलगावी,अमृतसर–श्री माता वैष्णो देवी कटरा व गाडी क्रमांक ०१००१ नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेस या तीन गाड्यांचा ध्वज फडकावून शुभारंभ करण्यात आला आहे.नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे कोपरगाव येथे आगमन झाल्यानंतर झालेल्या स्वागत समारंभास खा.भाऊसाहेब वाकचौरे, आ.आशुतोष काळे,माजी.आ.स्नेहलता कोल्हे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,राष्ट्रवादीचे प्रवक्ते संदीप वर्पे,मुकुंद सिनगर, सर्व सहकारी व रेल्वे विभागाचे अधिकारी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान परदेशातील रेल्वेच्या तुलनेत वंदे भारत सेवा सर्व बाबतीत उत्कृष्ट आहे.ही सेवा देशभर लोकप्रिय झाली आहे.नागपूर–पुणे ही सर्वाधिक अंतराची वंदे भारत रेल्वे आहे.
या कार्यक्रमात रेल्वे विभागाच्या वतीने आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली आहे.
दरम्यान इतर रेल्वे गाड्यापेक्षा या गाडीच्या तिकिटाचा दर जास्त असला तरी त्यात नाश्ता आणि जेवण प्रवाशांना रेल्वेकडून दिले जाणार आहे.वेटिंगचे कोणतेही तिकिट दिले जाणार नाही. कन्फर्म तिकिटच प्रवाशांना दिले जाणार असल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले.