रेल्वे सेवा
रेल्वे प्रश्नावर…या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार बैठक!

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या रेल्वेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी व प्रत्यक्ष पाहणी करणेसाठी दिनांक १९ जुलै रोजी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी भेट देणार असल्याची माहिती खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे प्रसिद्धी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

“दरम्यान या शिवाय या बैठकीत प्रामुख्याने आचलगाव,खिर्डी गणेश,संवत्सर,पुंणतांबा, पढेगाव,कान्हेगाव,लाडगाव,पढेगाव येथील अंडरपासची आवश्यकता असलेल्या ठिकाणी समक्ष भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहे.यासाठी संबधित शेतकऱ्यांनी बैठकीसाठी शिर्डी येथील खा. वाकचौरे यांचे निवासस्थानी उपस्थित रहावे”-खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी लोकसभा मतदार संघ.
पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गाला विरोध झाल्यानंतर संरेखनात बदल करत पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला समांतर औद्योगिक महामार्ग नेता येईल का,या दृष्टीने अहवाल तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले होते.मात्र सेमी हायस्पीड रेल्वेला समांतर औद्योगिक महामार्ग नेणे तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य असल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) अहवालात नमूद केले आहे.शिवाय हा मार्ग संगमनेर मधून नेण्यात खोडद (ता.जुन्नर) येथील ‘जायंट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) हा जागतिक दुर्बिण संशोधन प्रकल्प रेल्वेमार्गाला अडथळा ठरत असल्याचा बनाव करून रेल्वेमंत्री यांनी ‘पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक’ या नवीन रेल्वे मार्गाबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे आदेश जानेवारी महिन्यात रेल्वे प्रशासनाला दिले होते.
व संगमनेर मार्गे या प्रकल्पास विरोध केला आहे.त्यामुळे नाशिक,सिन्नर,कोपरगाव, संगमनेर,अकोले,राहाता,श्रीरामपूर आदी तालुक्यात मोठीं नाराजी आहे.

“उत्तर भारतीयांना मुंबई,पुण्यास आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी नाशिक वरून संगमनेर मार्गे सर्वात जवळचा मार्ग ठरणार आहे.शिवाय हा मार्ग जवळके मार्गे दोडी-दापूर दरम्यान पुणे-नाशिक रेल्वे मार्गास जोडल्यास दुष्काळी भागाच्या अर्थकारणास व शिर्डीतील साईभक्तांची गैरसोय दूर होऊन रेल्वेच्या अर्जकारणास गती मिळणार आहे”-नानासाहेब जवरे,माजी सदस्य,दक्षिण रेल्वे सल्लागार समिती,सोलापूर.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लाखोंच्या संख्येने तरुण पुणे आणि मुंबईत आहेत.त्यांना व मुंबई,पुणे,नाशिक या औद्योगिक त्रिकोणात रहिवासी उद्योजक,उच्च शिक्षणास असलेल्या तरुणांवर अन्याय होणार आहे.याबाबत पुणे येथील दिनांक २३ जूनच्या रेल्वे विभागीय बैठकीत खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी जोरदार आवाज उठवला होता.त्याला पुणे विभागातील अनेक खासदारांनी पाठिंबा दिला होता.तरीही सरकारने “किसी की ना सुनी” त्यामुळे आता याबाबत पुन्हा एक बैठक खा.वाकचौरे यांनी उद्या दिनांक १९ जुलै रोजी शिर्डी येथे खा. वाकचौरे यांचे निवासस्थानी आयोजित केली आहे.त्यात कोपरगाव,राहाता,सिन्नर,नाशिक भागातील सामाजिक कार्यकर्ते,नागरिक आवाज उठवणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान या शिवाय या बैठकीत प्रामुख्याने आचलगाव,खिर्डी गणेश,संवत्सर,पुंणतांबा, पढेगाव,कान्हेगाव,लाडगाव,पढेगाव येथील अंडरपासची आवश्यकता असलेल्या ठिकाणी समक्ष भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहे.दरम्यान संबधित शेतकऱ्यांनी बैठकीसाठी शिर्डी येथे उपस्थित राहावे असे आवाहन खा.वाकचौरे यांचे वतीने करण्यात आले आहे.