न्यायिक वृत्त
ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यातून पाच जणांची सुटका,कोपरगावात न्यायालयातील खटला

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील कोल्हार येथील आरोपी शिवाजी जिजाबा डांगे,शुभम राजेंद्र डांगे,निलेश भास्कर भालेराव,अक्षय शिवाजी डांगे,अभिजित शिवाजी डांगे,आदी पाच जणा विरोधात फिर्यादी धर्मा नारायण शिंदे याने लोणी पोलीस ठाण्यात सन-२०१४ साली ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता.या खटल्याची नुकतीच सुनावणी पूर्ण होऊन त्यातून वरील पाच आरोपींची निर्दोशमुक्तता केली असल्याची माहिती कोपरगाव येथील अड्.जयंत जोशी यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
आरोपीच्या वतीने अड्,जयंत जोशी यांनी सदर गुन्हा पच्छात बुद्धीने व सुडाने दाखल केला असल्याचा बचाव केला होता.फिर्यादी व साक्षिदार यांच्या जबाबातील विसंगती न्यायालयासमोर आणून दिल्या होत्या.व सदर प्रकरणात ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा होत नसल्याचा बचाव केला होता.व आरोपी जे दोषी नसून निर्दोष असल्याचे सांगितले होते.बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी.कोऱ्हाळकर यांनी वरील पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
पिढ्यानपिढ्या शोषणाचे बळी ठरलेल्या आणि सामाजिक समतेपासून वंचित राहिलेल्या दलित आणि आदिवासी समाजाला संरक्षण देण्यासाठी १९८९ मध्ये हा कायदा लागू झाला होता.मात्र या कायद्याचा गैरवापर होत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने मान्य करत खंडपीठाने २०१८ साली मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.त्यानुसार प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्यानंतरच अटकेचा पर्याय खुला राहणार आहे.त्यामुळे या पूर्वी या कायद्याचा गैरवापर करणाऱ्या अनेक घटना उघड होत आहे.अशीच घटना कोल्हार येथे सन-२०१४ सालात घडली होती.त्याचा निकाल नुकताच लागला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी धर्मा नारायण शिंदे याने लोणी पोलीस ठाण्यात दि.११ नोव्हेंबर २०१४ रोजी आरोपी शिवाजी जिजाबा डांगे,शुभम राजेंद्र डांगे,निलेश भास्कर भालेराव,अक्षय शिवाजी डांगे,अभिजित शिवाजी डांगे,आदी पाच जणा विरोधात जातीवाचक शिवीगाळ करून हातातील दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.लोणी पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी भा.द.वि.कलम १४३,१४७,३२५,तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत फिर्याद दाखल केली होती.या संबंधी पोलिसानी या गुन्ह्याची चौकशी करून दोषारोप पत्र कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते.
सदर प्रकरणी दोषारोप सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाच्या वतीने फिर्यादी,साक्षीदार,वैद्यकीय अधिकारी,तपासी अधिकारी,यांचेसह नऊ साक्षिदार तपासण्यात आले होते.आरोपीच्या वतीने अड्,जयंत जोशी यांनी सदर गुन्हा पच्छात बुद्धीने व सुडाने दाखल केला असल्याचा बचाव केला होता.फिर्यादी व साक्षिदार यांच्या जबाबातील विसंगती न्यायालयासमोर आणून दिल्या होत्या.व सदर प्रकरणात ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा होत नसल्याचा बचाव केला होता.व आरोपी जे दोषी नसून निर्दोष असल्याचे सांगितले होते.बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी.कोऱ्हाळकर यांनी वरील पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.या निकालाकडे राहाता,कोपरगाव तालुक्याचे व उत्तर नगर जिल्ह्याचे लक्ष लागून होते.
दरम्यान या खटल्यात बचाव पक्षातर्फे अड्.जयंत जोशी यांनी काम पाहिले आहे.त्यांना अड्.व्यंकटेश ख्रिस्ते,अड्.योगेश दाभाडे,अड्.शिवम मोरे आदींनी सहकार्य केले आहे.