न्यायिक वृत्त
कोपरगावात दुचाकी जाळली,मेहुण्याला तीन महिन्याची शिक्षा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण दीड कि. मी.अंतरावर असलेल्या शारदा नगर येथील रहिवासी असलेल्या आरोपी सुनील मधुकर नागरे या मेहुण्याने रागाच्या भरात त्याच्या मुलाला मारहाण केली होती व फिर्यादी बायकोचा भाऊ आनंद मधुकर भडकवाडे याची दुचाकी दि.१३ फेब्रुवारी २००६ रोजी पेटवून दिली होती.याबाबत कोपरगाव न्यायालयात सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने आरोपी नागरे यास कोपरगाव येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी श्री डोईफोडे यांनी तीन महिन्याची शिक्षा व नुकसान भरपाई पोटी तीस हजारांचा दंड ठोठावला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मेहुण्याने आपल्या बायकोचा भाऊ आल्याचे पाहून त्याच्या मुलास मारहाण करण्यास सुरुवात केली.आलेल्या मेहुण्याने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असता.त्यांचा राग आणखी अनावर झाला.व त्याने आणखी मारहाण सुरु केली.अखेर आलेल्या पाहुण्याने आपल्या बहिणीला व भाच्याला घेऊन जवळच असलेल्या नगर-मनमाड रस्त्यावर जाऊन त्यानां रिक्षात बसवून दिले व तो थोड्या वेळात पुन्हा घटनास्थळी गेला असता त्याला त्याची दुचाकी जाळून टाकल्याचे निदर्शनास आले त्यातून हा गुन्हा दाखल झाला होता.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी आनंद भडकवाडे यांची बहीण हि आरोपी सुनील नागरे यास दिलेली आहे.त्याचे आपापसात किरकोळ वाद होते.दरम्यान फिर्यादी मेहुणा हा काही कामासाठी बहिणीला भेटण्यासाठी दि.१३ फेब्रुवारी २००६ रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास गेला असता.त्याच्या मेहुण्याने आपल्या बायकोचा भाऊ आल्याचे पाहून त्याच्या मुलास मारहाण करण्यास सुरुवात केली.आलेल्या मेहुण्याने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असता.त्यांचा राग आणखी अनावर झाला.व त्याने आणखी मारहाण सुरु केली.अखेर आलेल्या पाहुण्याने आपल्या बहिणीला व भाच्याला घेऊन जवळच असलेल्या नगर-मनमाड रस्त्यावर जाऊन त्यानां रिक्षात बसवून दिले व तो थोड्या वेळात पुन्हा घटनास्थळी गेला असता त्याला त्याची दुचाकी (क्रं.एम.एच.१७ एम.१८७) हि पेटवून दिली असल्याचे लक्षात आले.त्याने तात्काळ कोपरगाव येथील अग्निशामक बंब गाडीला आग विझविण्यासाठी कळवले व कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांना घटनेची खबर दिली होती.अग्निशामक गाडीच्या कर्मचाऱ्यांनी सदर गाडीची आग विझवली मात्र तो पर्यंत गाडी जळून खाक झाली होती.फिर्यादी आनंद भडकवाडे यांनी अखेर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपली फिर्याद दाखल केली होती.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध भा.द.वि.कलम ४३५,३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली होती.व या प्रकरणी आरोप पत्र कोपरगाव येथील न्यायालयात दाखल केले होते.
याबाबत सुनावणी होऊन दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीस तीन महिन्याची शिक्षा सुनावली आहे.व गाडी जाळल्याबद्दल तीस हजारांचा दंड केला आहे.व दंड भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली आहे.या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस.ए.व्यवहारे यांनी काम पाहिले होते.