जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

कोयत्याने गंभीर वार,आरोपीस दंडासह १० वर्षाची शिक्षा !

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  कोपरगाव शहरातील गांधीनगर येथील जखमींच्या पुतणीच्या हळदीच्या कार्यक्रमात आरोपी गणेश मारुती गायकवाड याने झेंडा गल्ली गांधीनगर येथील फिर्यादी अमोल किशोर मंजुळ (वय-२८) याचेवर कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केले होते.या प्रकरणी कोपरगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयात नुकतीच सुनावणी संपन्न झाली असून त्यात आरोपी गायकवाड यास न्या.डी.डी.अलमले यांनी भा.द.वि.कलम ३०७ अन्वये १० वर्ष कारावास व ०५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.त्यामुळे कोपरगाव शहरातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत मिळणार आहे.

दरम्यान या खटल्याची सुनावणी नुकतीच कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.डी.डी.अलमले यांचे न्यायालयात संपन्न झाली आहे.त्यात आरोपी गणेश गायकवाड यास १० वर्षे कारावास व ०५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.सदर खटल्यात सरकारी वकील म्हणून ॲड.शरद गुजर यांनी कामकाज पाहिले होते.न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

  कोपरगाव शहर आणि तालुक्यातील चोऱ्या, माऱ्या, वाळू,गुटखा,मटका आदी अवैध व्यवसाय,गुन्हेगारीचा आलेख सारखा वाढत चालला असून त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.आरोपींकडे गावठी कट्टे आढळून येत असून नुकताच संवत्सर येथील एक चांगल्या तरुणाचा बळी गेला असल्याची संवत्सर आणि परिसरात चर्चा आहे.या किरकोळ गुन्ह्यात आरोपी कट्टे,कोयते,तलवारी आदींचा सर्रास वापर करताना दिसत आहे.त्यामुळे शहर आणि तालुक्यातील नागरिकांत हा प्रामुख्याने चिंतेचा विषय बनला आहे.अशीच घटना सन-२०१८ नववर्षात ०१ जानेवारी रोजी मध्ये गांधीनगर या उपनगरात घडली होती.फिर्यादी व जखमी तरुण अमोल मंजुळ यांच्या पुतणीचे लग्न होते.त्यामुळे आदल्या रात्री गुन्हा घडल्या दिवशी फिर्यादी त्याचे चुलत भाऊ रामदास बबन मंजुळ,स्वप्नील मंजुळ,विकी मंजुळ आदीसह नातलग मंडळी हळदीच्या कार्यक्रमाचा रात्री ८.३० वाजेच्या सुमारास आनंद घेत नाचत होते.त्याच वेळी ०१ जानेवारी २०१८ रोजी ०९ वाजेच्या सुमारास आरोपी गणेश मारुती गायकवाड (वय-४५) याने मागील भांडणाचे निमित्त काढून थेट त्या ठिकाणी फिर्यादी अमोल मंजुळ याच्यावर मागील भांडणाचे कारणावरून हल्ला करत असताना,”तुला,खल्लास करून टाकतो” असे बरळत त्याने कोयत्याने अमोल मंजुळ याचेवर हल्ला चढवला होता.त्यात त्याने बचाव करताना डावा हात वर करून बचाव करण्याचा प्रयत्न केला होता.त्यात तो गंभीर जखमी झाला होता.

कोपरगाव शहर पोलिस ठाणे.

   दरम्यान या घटनेचे गांभीर्य ओळखून नजिकच्या नातेवाईक,नागरिकांनी व मित्रांनी जखमी अमोल मंजुळ यास नजिकच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.दुखापत जास्त असल्याने पुढील उपचारार्थ शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात भरती केले होते.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी दवाखान्यात जावून जखमींचा जबाब नोंदवला होता.कोपरगाव शहर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक ०३/२०१८ अन्वये आरोपी गणेश मारुती गायकवाड रा.गांधीनगर याचेवर गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणात शहर पोलिसांनी सदर गुन्हा जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग केला होता.

   दरम्यान या खटल्याची सुनावणी नुकतीच कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.डी.डी.अलमले यांचे न्यायालयात संपन्न झाली आहे.त्यात आरोपी गणेश गायकवाड यास १० वर्षे कारावास व ०५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.सदर खटल्यात सरकारी वकील म्हणून ॲड.शरद गुजर यांनी कामकाज पाहिले होते.त्यांनी सदर खटल्यात मध्ये महत्वाचे ०७ साक्षीदार तपासले होते.सदर खटल्यात फिर्यादी अमोल किशोर मंजूळ व उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.यात पो.हे.कॉ.सुभाष माळी यांनी कोर्ट पैरवी म्हणून कामकाज पाहिले सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक व्हि.आर.थोरात केला होता.या गुन्ह्यात आरोपीस कठोर शासन झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close