जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नैसर्गिक आपत्ती

नगराध्यक्ष उमेदवारीत आ.काळे गटाचा मोठा धक्कादायक निर्णय !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
 
   कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीची माजी आ.कोल्हे गटाची काल नगराध्यक्षपदासह नगरसेवकांची उमेदवारी जाहीर झाला असताना आज दि.13 नोव्हेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता आ.आशुतोष काळे यांच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली असून त्यांनी धक्कादायकपणे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांची उमेदवारी केल्याने कोल्हे गटास मोठा धक्का मानला जात आहे.त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या कोल्हे गट पिछाडीवर गेला असल्याचे मानले जात आहे.

   

  यावेळी ओमप्रकाश कोयटे यांनी आपल्याला एका प्रसिद्ध ज्योतिषाने सांगितले होते की,” तुम्ही राजकारणात पन्नास वर्षे काम केल्यानंतर तुम्हाला संधी मिळणार असल्याचे सांगितले होते.आज आ.काळे गटाच्या माध्यमातून ही संधी आपल्याला मिळाली असल्याचे सांगून ते भविष्य आज खरे ठरले आहे.

  राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी आगामी 02 डिसेंबरला मतदान होणार आहे.31 जानेवारीच्या आत सर्व निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत.त्या दिशेनं निवडणूक आयोगाने प्रवास सुरू केला असून काल दि.१० नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे.त्याची अंतिम मुदत-१७ नोव्हेंबर असून त्याची छाननीची तारीख-१८ नोव्हेंबर असून ते माघार घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर आहे.अपील नसलेल्या ठिकाणी अंतिम मुदत-२५ नोव्हेंबर आहे.तर निवडणूक चिन्ह आणि अंतिम यादी-२६ नोव्हेंबर रोजी दुपारी जाहीर होणार आहे.तर माघार झाली नाही तर मतदानाचा दिवस-२ डिसेंबर निश्चित करण्यात आला आहे.

 

“आपले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचेसह राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क असल्याने त्याचा कोपरगाव पालिकेसाठी मोठा आर्थिक फायदा होणार आहे.आणि हे शहर राज्यात पथदर्शी करणार आहे”-ओमप्रकाश कोयटे,नगराध्यक्ष उमेदवार, आ.काळे गट.

  त्यामुळे सर्वच पक्ष आणि कार्यकर्ते कामाला लागले आहे.जोरजोराने ढोल ताशे बडवले जात असून रणभेऱ्या गर्जत असून नाल,घोडे,तंग,तोबरा,जमा करण्यात सर्व गर्क आहे.विश्रांती अजिबात नको ची हाळी झाली आहे.कोपरगाव नगरपरिषद त्याला अपवाद नाही.इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने त्या जागेवर अनेक ओबीसी नेते आणि कार्यकर्ते इच्छुक असताना माजी आ.कोल्हे गटाने त्यावर पाणी फिरवले आहे.

आ.काळे गटाकडून इच्छुक मात्र अपेक्षाभंग झालेल  उमेदवार सुनील गंगूले,कृष्णा आढाव, वीरेन बोरावके,मंदार पहाडे आदी दिसत आहे.

  परिणामी ओबीसी नेते आणि उमेदवारांत मोठी नाराजी दिसून येत आहे.आता आ.काळे गट नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय निरिक्षांचे लक्ष लागून राहिले होते.आज त्यासाठी त्यांनी,’ कृष्णाई ‘ मंगल कार्यालयात आपल्या उमेदवाऱ्या जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.त्यात हा निर्णय जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.त्यामुळे आ.काळे गटाचे मंदार पहाडे,वीरेन बोरावके,कृष्णा आढाव,सुनील गांगुले यांच्या आशा अपेक्षांवर पाणी फिरले असल्याचे उघड झाले असून आ .काळे गटाच्या या निर्णयाने त्यांच्या विजयाचे मेरिट वाढले असल्याचे मानले जात आहे.

  

  सदर प्रसंगी ओमप्रकाश कोयटे यांचेसह आ.कोल्हे गटाकडून उमेदवारी जाहीर झालेले उमेदवार जनार्दन कदम यांनी प्रवेश केल्याने कोल्हे गटास मोठा धक्का बसला आहे.
सदर प्रसंगी सुधीर डागा,डॉ.अजय गर्जे,संदीप कोयटे,विरेन बोरावके,आदी मान्यवर उपस्थित होते.

               ———————————

*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.

https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close