जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

कोपरगावातील…या दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी राजेश नामदेवराव परजणे यांची तर उपाध्यक्षपदी गोपीनाथ सुलाजी केदार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

“कोपरगांव तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील दूध उत्पादकांची कामधेनू म्हणून संघाची वाटचाल सुरु आहे.या वाटचालीत नामदेवराव परजणे यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा लाभलेला असल्याने संघाने दूध उत्पादकांचे हीत डोळ्यासमोर ठेऊनच वाटचाल सुरु ठेवलेली आहे”-राजेश पराजणे,नूतन अध्यक्ष,नामदेवराव परजणे पा.गोदावरी दूध संघ,कोपरगाव.

विभागीय उपनिबंधक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी दीपक पराये यांच्या उपस्थितीत संघाच्या सभागृहात आज मंगळवार दि. २३ मे रोजी सभा घेण्यात येऊन पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडली आहे.

यावेळी अध्यक्षपदासाठी राजेश परजणे तर उपाध्यक्षपदासाठी गोपीनाथ केदार या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने सदर निवड बिनविरोध पार पडली आहे.अध्यक्षपदाची सूचना नवनिर्वाचित संचालक गोरक्षनाथ पंढरीनाथ शिंदे यांनी मांडली.त्यास संचालक संजय ज्ञानदेव टुपके यांनी अनुमोदन दिले आहे.तसेच उपाध्यक्षपदाची सूचना संचालिका सुमनताई सुदाम शिंदे यांनी मांडली त्यास संचालक नानासाहेब रामराव काळवाघे यांनी अनुमोदन दिले आहे.

गोदावरी खोरे दूध संघाची निवडणूक नुकतीच होऊन त्यात राजेश परजणे,गोपीनाथ केदार यांच्यासह विवेक कृष्णराव परजणे,उत्तमराव रामराव डांगे,भाऊसाहेब सुंदरराव कदम,गोरक्षनाथ पंढरीनाथ शिंदे,नानासाहेब रामराव काळवाघे, सुदामराव कारभारी कोळसे,जगदीप आण्णासाहेब रोहमारे,संजय ज्ञानदेव टुपके,भिकाजी दगडू झिंजुर्डे,दिलीप बबनराव तिरमखे,सुनंदाताई सुभाषराव होन.सरलाताई सोपान चांदर,सुमनताई सुदाम शिंदे आदींची संचालकपदी बिनविरोध निवड झालेली आहे.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजेश परजणे यांनी सांगितले की,”कोपरगांव तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील दूध उत्पादकांची कामधेनू म्हणून संघाची वाटचाल सुरु आहे.या वाटचालीत नामदेवराव परजणे यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा लाभलेला असल्याने संघाने दूध उत्पादकांचे हीत डोळ्यासमोर ठेऊनच वाटचाल सुरु ठेवलेली आहे.सध्या दुग्ध व्यवसायामध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झालेली असताना संघ टिकवून ठेवला आहे.पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close