आंदोलन
मराठा समाजाला पाठिंबा भोवला,पंचवीस जणांवर गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात सर्वत्र मराठा समाजाला आरक्षण हा विषय ऐरणीवर आला असताना त्यास पाठींबा देण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील बस स्थानकावर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काल सकाळी १०.५० वाजेच्या सुमारास ‘रास्ता रोको आंदोलन’ केले असता कोपरगाव तालुका पोलिसांनीं नारायण संपतराव मांजरे,ज्ञानदेव दगुजी मांजरे सुनील शिवाजी मांजरे यांचे सह २०-२५ जणांवर गुन्हा दाखल केल्याने धमोरीसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवे आहे,या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.तसेच सगे सोयरेची मागणी मान्य केली जात नाही तोपर्यंत आजपासून दररोज दोन तास रास्ता रोको करण्याचे कार्यकर्त्यांना आदेश दिले आहे.त्यातून धामोरी येथील रास्ता रोको हे आंदोलन केले होते.त्यातून हा गुन्हा दाखल झाला आहे.
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक महाराष्ट्र सरकारने विधिमंडळात मंजूर केले आहे.मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गात मराठा आरक्षणाची मागणी केली होती.पण,महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे.मात्र,मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवे आहे,या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.तसेच सगे सोयरेची मागणी मान्य केली जात नाही तोपर्यंत आजपासून दररोज दोन तास रास्ता रोको करण्याचे कार्यकर्त्यांना आदेश दिले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.त्यांच्या या हाकेला ‘ओ’ देत कोपरगाव शहरातील साईबाबा चौक येथे मराठा समाजातील कार्यकर्त्यांनीं,’रास्ता रोको आंदोलन’ केले होते.त्या नंतर धामोरी येथील काही तरुणांनीं एकत्र येत बस स्थानकासमोर काल सकाळी ११.५० च्या सुमारास आंदोलन केले होते.
दरम्यान याची गंभीर दखल कोपरगाव तालुका पोलिसानी घेतली असून या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.यात नारायण संपतराव भाकरे,ज्ञानदेव दगुजी मांजरे,सुनील शिवाजी मांजरे,नारायण बारकू मांजरे,सचिन जना कुऱ्हाडे,शिवाजी काशिनाथ वाघ,सुनील विष्णू वाणी,अशोक दशरथ भाकरे,प्रकाश विश्वनाथ वाघ,व इतर २०-२५ जण अनोळखी नागरिक आदी विरुद्ध गुन्हा क्रं.५२/२०२४ भा.द.वि.कलम ३४१,१८८ व मुंबई पोलीस अधिनियम’ चे कलम ३७(१)(३)१३५ चे उल्लंघन केले असल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी फिर्यादी पो.कॉ.युवराज खुले (वय-४२) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे ग्रामस्थांत संतापाचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान या प्रकरणी पुढील तपास तालुका पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.संदीप बोटे हे करत आहेत.