निवड
अखिल भारतीय धोबी महासंघाचे,’समाजभूषण’ पुरस्कार जाहीर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दिल्लीस्थित अखिल भारतीय धोबी महासंघाच्या वतीने २०२२ मध्ये देण्यात येणाऱ्या चाळीस “राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कारात अ.नगर जिल्ह्यातील राहाता येथील राजेंद्र फंड,शिर्डी येथील खंडेराव कडलग,कोपरगांव येथील सुनील फंड व श्रीरामपूर येथील लक्ष्मण निकम आदी चौघांचा समावेश आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
राजेंद्र फंड हे साहित्यिक असून पंचायत समिती राहाता येथे आरोग्य पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी अनेक समाजाभिमुख कामे केली आहेत.
दुसरे पुरस्कारार्थी खंडेराव कडलग हे शिर्डी येथे राहणारे असून समाजासाठी तंटामुक्तीसाठी एक आधारस्तंभ आहेत.अनेक कुटुंबांचे संसार वाचवण्यात त्यांना यश आले आहे.
सुनील फंड हे कोपरगांवमधील असून परीट/धोबी समाजाचे अ.नगर जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतात.मुंबादेवी तरुण मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव,नवरात्र उत्सव,श्रीराम नवमी,शिवजयंती,गाडगेबाबा जयंती,साई पालखी सोहळा तर्फे कोपरगांव ते शिर्डी अशी साईबाबांची पदयात्रा काढतात.
कोपरगांव शहरात गाडगेबाबा सांस्कृतिक भवन उभारण्यात मोलाचा सहभाग आहे.१९९२ च्या कोपरगांव शहरातील पाणीटंचाईच्या काळात मंडळामार्फत सायफनव्दारे पाणीवाटप करून जनतेची तहान भागवली.सार्वजनिक वाचनालय सुरू केले,तरुणांमध्ये व मुलींमध्ये ढोल ताशा,तलवारबाजी,लाठीकाठी,मर्दानीखेळ,मल्लखांब,पिरॅमिड,दहीहंडी यासारख्या खेळाचे वर्ग सुरू करून विविध सामाजिक उपक्रमात सहभाग घेणे.शिवाय विद्यार्थी सेनेच्या व मनसेच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक कार्याकरीता आंदोलन मोर्चे काढणे,या व इतर कारणासाठी हा राष्ट्रीय स्वरूपाचा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य परीट/धोबी संघटनेचे अ.नगर जिल्हा माजी जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय सदस्य असलेले श्रीरामपूर येथील लक्ष्मण निकम म्हणजे समाजातील लग्न जमवण्याचे सामाजिक काम करत आहे. श्रीरामपूर येथे ज्येष्ट नागरिक आनंद मेळावा भरविणे,आरोग्य शिबिरे भरवणे,धार्मिक सहलीचे आयोजन करणे असे उपक्रम ते घेत असतात.सर्व पुरस्कर विजेत्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.