खेळजगत
कोपरगावातील… या विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे क्रीडा स्पर्धेत यश

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील नुकत्याच जिल्हास्तरीय विविध गुण दर्शन व क्रीडा स्पर्धेत सन २०२२-२३ शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेत डॉ.सी.एम.कन्या विद्या मंदिर या विद्यालयातील विद्यार्थिनींनी पुरेसे मैदान नसतांना देखील लक्षवेधी यश संपादन केले असल्याचे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत कु.साईली सूर्यकांत सोनगिरे हिने १९ वर्षे मुली या गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे तर कु.श्रुती निवृत्ती मुरडनर व कु.प्रांजली विजय मेहेरे यांनी विविध वजनगटात जिल्हास्तर सुवर्णपदक प्राप्त केले.या तिनही खेळाडुंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्या अ.नगर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तसेच मैदानी क्रीडा स्पर्धामध्ये १४ वर्षे वयोगटात साक्षी महाजन (गोळाफेक प्रथम,थाळीफेक द्वितीय),अफिया पठाण (गोळाफेक-द्वितीय) ,प्रिया गायकवाड ( ६००मी.धावणे-तृतीय);१७ वर्षे वयोगटात अपेक्षा नेटके (गोळाफेक,हातोडा फेक – प्रथम),मयुरी पगार (थाळीफेक, गोळाफेक-द्वितीय),आयुष्का दिवेकर,गायत्री शिंदे (३०००मी. धावणे) ,१९ वर्षे वयोगटात सायली गायकवाड (गोळाफेक -प्रथम , थाळीफेक-द्वितीय) या सर्व खेळाडूंची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्याचबरोबर ‘कुस्ती’ या क्रीडाप्रकारात देखील विद्यार्थिनींनी लक्षवेधी यश संपादन केले.यात विविध वजनी गटात सेजल बोरसे , ईश्वरी नाईकवाडे,भूमिका आघाडे,श्वेता बेंद्रे,भक्ती बिडवे,प्रांजली मेहेरे,सायली पवार,समिक्षा लोखंडे,श्रद्धा गायकवाड,गायत्री सायकर,निशा आढाव यांची जिल्हासर स्पर्धेसाठी निवड झाली.कॅरम या क्रीडा प्रकारात सिद्धी लांडगे,अक्षरा बोधले यांनी विशेष प्रभाव दाखवला आहे.
या यशस्वी खेळाडूंना क्रीडाशिक्षक नितीन निकम यांचे मार्गदर्शन लाभले तर भारती गागरे,विदया घेरे,गितांजली गायकवाड,मनिषा कोकणी,मंगल निर्मळ,सविता साबळे,सविता चंद्रे आदींचे सहकार्य लाभले होते.