जाहिरात-9423439946
कृषी विभाग

…या मतदार संघात ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्त्यासाठी ७० कोटींचा निधी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी लोकसभा मतदार संघातील शेत रस्त्यासाठी मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेतून ७० कोटी रूपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांच्या माध्यमातून खा.सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला असल्याची माहिती बाळासाहेबांच्या उत्तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी दिली आहे.

“शेती उत्पादित माल बाजारपेठत विक्री करण्यासाठी ने-आण करण्यासाठी खराब रस्त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.पर्यायाने शेतमालाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत होता.अनेक शेतकऱ्यांनी याबाबतच्या अडचणी खा.लोखंडे यांच्या कानी घातल्या होत्या व मुख्यमंत्री शिंदे व रोजगार हमी मंत्री भुमरे यांचे लक्ष वेधले होते.व मतदार संघातील १३२ रस्त्यासाठी ७० कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे”-कमलाकर कोते,अध्यक्ष,नगर जिल्हा बाळासाहेबांची शिवसेना,उत्तर नगर जिल्हा.

शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाचा उपलब्धतेमुळे त्याचप्रमाणे कृषीयांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी,आंतरमशागत, कापणी,मळणी आणि इतर कामे ही यंत्रामार्फत करण्यात येत आहेत.शेतीमाल बाजारात पोहोचवण्याकरता व यंत्रसामुग्री शेती पर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही रस्त्यांची आवश्यकता असते.त्याचप्रमाणे शेतरस्ते हे रस्ते योजनेमध्ये येत नसल्याने योजनांच्या अभिसरणमधून ‘पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना‘ महाराष्ट्र राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.मात्र याबाबत शिर्डी लोकसभा मतदार संघात या कामाची वाणवा होती त्या साठी हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.अनेक शेतकऱ्यांनी याबाबतच्या अडचणी खा.लोखंडे यांच्या कानी घातल्या होत्या.त्यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे व रोजगार हमी मंत्री भुमरे यांचे लक्ष वेधले होते.व मतदार संघातील १३२ रस्त्यासाठी ७० कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे.

दरम्यान या मंजूर रस्त्यात श्रीरामपूर तालुका-५४ गावे ९७.५ कि.मी.नेवासा तालुका-२० गावे ३७.५ कि.मी.,राहुरी तालुका-३१ गावे ५७.५ कि.मी.,संगमनेर तालुका-१५ गावे २७.५ कि.मी.,कोपरगाव तालुका-१९ गावे ३४ कि.मी.,अकोले तालुका-११ गावे १९ कि.मी.,राहाता तालुका-२० गावे ३८ कि.मी.अशा प्रकारे १७० गावातील ३११ कि.मी.शेत पाणंद रस्त्यासाठी ७० कोटीच्या वर निधी उपलब्ध झालेला आहे.याबद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close