निवड
कोपरगाव तालुक्यातील..या सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निडणुकीत अध्यक्षपदी विष्णूपंत विघे यांची तर उपाध्यक्षपदी सचिन मेहत्रे यांची निवड करण्यात आली आहे नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या सेवा संस्थेच्या अध्यक्षपदाची व उपाध्यक्ष पदाची नवडणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यात हि निवड झाली आहे.सदर निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी विष्णूपंत रंगनाथ विघे यांच्या नावाची सूचना दादासाहेब शितोळे यांनी मांडली.सदर सूचनेला ज्ञानदेव होन यांनी अनुमोदन दिले होते.तर उपाध्यक्ष पदासाठी सचिन शांताराम मेहेत्रे यांच्या नावाची सूचना भाऊसाहेब होन यांनी मांडली होती.
कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली असून यात श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या गटाने कोल्हे गटाच्या सत्तेला सुरुंग लावून सोसायटीची सत्ता हस्तगत केली होती.त्यात त्यांनी १२ हि जागा मोठ्या मताधिक्क्याने जिंकल्या होत्या.
या सेवा संस्थेच्या अध्यक्षपदाची व उपाध्यक्ष पदाची नवडणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यात हि निवड झाली आहे.सदर निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी विष्णूपंत रंगनाथ विघे यांच्या नावाची सूचना दादासाहेब शितोळे यांनी मांडली.सदर सूचनेला ज्ञानदेव होन यांनी अनुमोदन दिले होते.तर उपाध्यक्ष पदासाठी सचिन शांताराम मेहेत्रे यांच्या नावाची सूचना भाऊसाहेब होन यांनी मांडली होती. त्या सूचनेला बबनराव कोल्हे यांनी अनुमोदन दिले होते.
अध्यक्ष उपाध्यक्ष पदावर अनुक्रमे विष्णू विघे व सचिन मेहेत्रे यांचे एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक अधिकारी आर.एस.जोशी यांनी त्यांची निवड झाल्याचे जाहीर केले आहे.
सदर निवडणूक कामी सोसायटीचे सचिव हेमंत मोकळ यांनी सहकार्य केले.यावेळी नूतन संचालक भाऊसाहेब कोल्हे,दादासाहेब शितोळे,शिवाजी होन,सतीश गुंड,बबन कोल्हे,ज्ञानदेव होन,भाऊसाहेब होन,प्रभाकर कोल्हे,मनीषा सुभाष कोल्हे,सुनिता संजय कोल्हे तसेच बाबुराव कोल्हे,चांगदेव होन,पोपटराव गुंड,पोपट कोल्हे,राजेंद्र कोल्हे,सुभाष कोल्हे,राजेंद्र होन,विठ्ठल कोल्हे,संजय कोल्हे,अशोक होन,प्रीतम मेहेत्रे आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माजी आ.अशोक काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.