शैक्षणिक
कोपरगावात डॉ.विभांडिक यांचे व्याख्यान संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील के.जे.सोमय्या महाविद्यालय आणि स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालय येवला यांचे संयुक्त विद्यमाने (MOU अंतर्गत) “फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत “अप्लाइड अस्पेक्ट्स ऑफ डेव्हलपमेंटल बायलॉजी” या विषयावर सोमय्या महाविद्यालयात प्राध्यापक डॉ.अजय विभांडीक यांचे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
पृथ्वीवर अमिबा पासुन ते आजच्या अतिविकसित मानवा पर्यंतची वाटचाल व त्यांचा विकास क्रमाक्रमाने कसा होत गेला,सजीवांची निर्मिती व उत्क्रांती कशी झाली याचे संविधानिक विश्लेषण डॉ.विभांडीक यांनी केले.यावेळी त्यांनी अनेक उदाहरणे देखील दिली.व्याख्यानापूर्वी डॉ.अजय विभांडीक यांचा प्राचार्य डॉ. बी.एस.यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
या व्याख्यानाला बी.एस.स्सी व एम.एस.स्सी प्राणिशास्त्र भाग एक व दोनचे बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.तसेच प्रा.हेमंत असने,प्रा.संकेत मोकळ,प्रा.सुवर्णा चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
या व्याख्यान सत्राचे प्रास्ताविक प्राणी शास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.डी.गवळी यांनी केले तर आभार प्राध्यापक वृषाली पेटकर यांनी मानले.