निवड
…या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड जाहीर !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघातील सडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच अनिता संतोष बारहाते यांनी रोटेशननुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे लोकनियुक्त सरपंच आशा सूर्यभान बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या रिक्त उपसरपंच पदासाठीच्या निवडणुकीत नितीन अंकुश बारहाते यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आलेल्या ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी नितीन अंकुश बारहाते यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते बापूराव बारहाते,अशोक बारहाते,सडे ग्रामपंचायतीच्या सरपंच आशाताई बारहाते,अनिल बारहाते,ग्रामपंचायत सदस्य मीरा बारहाते,सिद्धार्थ मोकळ,गणेश बारहाते, विजय बारहाते,सतीश बारहाते,सुनील बारहाते,रमेश वाकचौरे,संजय बारहाते,छबुराव बारहाते,प्रभाकर बारहाते,संतोष बारहाते,दिगंबर लोहकणे,संदीप बारहाते,सागर बारहाते,सुदाम बारहाते, योगेश बारहाते,सुभाष बारहाते,पोपट बारहाते,दिपक बारहाते,गोकुळ बारहाते आदी मान्यवर उपस्थित होते.नवनिर्वाचित उपसरपंच नितीन बारहाते यांचे माजी आ.अशोक काळे,आ. आशुतोष काळे आदींनी अभिनंदन केले आहे.



