गुन्हे विषयक
४३ हजार रुपयांच्या रस्तालुट उघड,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा नंगानाच सुरूच असून नुकतेच धामोरी येथील फिर्यादी इसम खंडू मुरलीधर मांजरे (वय-५८) हे आपल्या दुचाकीवरून रात्री १०.१५ वाजता घरी जात असताना सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील ब्राम्हणनाला येथे वळणावर अज्ञात चार चोरट्यांनी मागून येऊन त्यांच्या दुचाकीला जोराची लाथ मारून त्यांना खाली पाडून त्याच्या कडील बजाज दुचाकी,रोख रक्कम,भ्रमणध्वनी असा ४३ हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला असल्याने सुरेगाव परिसरासह कोपरगाव तालुक्यात चोरट्यांची दहशत पसरली आहे.

धामोरी येथील रहिवासी व खाजगी नोकरी करणारे गृहस्थ खंडू मांजरे हे आपल्या बजाज प्लॅटिना दुचाकी वरून घरी जात होते दरम्यान रस्ता सुनसान असताना त्यांच्या मागावर काही अज्ञात चार चोरटे सुरेगाव हद्दीत मागील बाजूने येऊन त्यांनी त्यांच्या दुचाकीस लाथ मारून त्यांना खाली पाडून त्यांच्याकडील सुमारे ४३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोरट्यांचा उपद्रव अद्याप कमी होण्याचे नाव घेताना दिसत नसून काही दिवसापूर्वी
वडांगळे वस्ती येथील चोरीचा गुन्हा दाखल झाल्याची शाई वाळते न वाळते तोच कोपरगाव येथील साखरे स्टील यांची ५० हजारांची चोरी झाली असून त्याच रस्त्यालगत योगीराज फर्निचर,संस्कृती साडी डेपो आदिसंह सात दुकाने फोडली होती त्यानंतर मागील सप्ताहात डॉ.जगदीश झंवर यांच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याची साखळी चोरट्यांनीं तोडून नेण्याचा प्रयत्न केला होता त्यातील सुमारे ९० हजार रुपये किमतीची दिड तोळा वजनाची सोनसाखळी घेऊन जाण्यात ते यशस्वी ठरले असताना काल दि.१२ सप्टेंबरच्या रात्री १०.१५ वाजता धामोरी येथील रहिवासी व खाजगी नोकरी करणारे गृहस्थ खंडू मांजरे हे आपल्या बजाज प्लॅटिना दुचाकी (क्रं.एम.एच.१७ सी.एफ.५६२५) वरून घरी जात असताना व रस्ता सुनसान असताना त्यांच्या मागावर काही अज्ञात चार चोरटे सुरेगाव हद्दीत मागील बाजूने येऊन त्यांनी त्यांच्या दुचाकीस लाथ मारून त्यांना खाली पाडले होते.व त्यांना भीती दाखवत त्यांची २५ हजार रुपये किमतीची बजाज प्लॅटिना दुचाकी,खिशातील १४ हजार रुपयांची रोख रक्कम,व ०४ हजार रुपये किमतीचा मोटोरोला कंपनीचा भ्रमणध्वनी असा सुमारे ४३ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे.या लुटीनंतर ते आपल्या वाहनाने पळून गेले आहे.
दरम्यान सदर ठिकाणी चोरटे गेल्याची खात्री झाल्यावर फिर्यादी इसम मांजरे हे सावरले व त्यांनी कोपरगाव तालुका पोलिसांशी संपर्क करून त्यांना आपला घडलेला वृत्तांत सांगितला आहे.व आपली फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.घटनास्थळी शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके,तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरिक्षक महेश कुसारे आदींनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनीं आपल्या पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.४४३/२०२३ भा.द.वि.कलम ३९२,३४ प्रमाणे अज्ञात चार चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कुसारे हे करत आहेत.