कोपरगाव तालुका
कोपरगाव नगरपरिषदेत…गटाची श्रेयासाठी धडपड-आरोप

जनशक्ती न्यूजशक्ती
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती श्री.संभाजी महाराज सर्कल पर्यंतच्या रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे “तांत्रिक मान्यतेसाठी” पाठविले होते.शहरातील हा अत्यंत महत्वाचा व जास्त रहदारीचा रस्ता आहे.खोदकाम करून या रस्त्याचे काम करावे लागणार आहे.साडेतीन कोटी रुपये अंदाजपत्रक असलेला हा रस्ता करणे अत्यंत गरजेचे आहे.साडेचार वर्षे ज्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात काहीच दोष दिसला नाही त्यांना मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दोष दिसायला लागले आहेत.स्वतःच्या प्रभागात कामे करून घेतांना जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता चालली,पण आता शहरातील जास्त रहदारीचे रस्ते झाले तर नगराध्यक्ष विजय वहाडणे व आ.आशुतोष काळे यांना श्रेय मिळेल असा संकुचित विचार होत असल्याचा दावा केला आहे.
काहीजण सदरचा रस्ता व्हावा म्हणून निवेदनावर जनतेच्या सह्या घेत आहेत असे समजत असून त्यांना जनतेला असे भासवायचे कि,आमच्यामुळेच रस्ता होत आहे.त्यासाठी सह्यांची मोहिम राबवून केविलवाणे राजकारण सुरू आहे मात्र तो प्रयत्न यशस्वी होणार नाही-विजय वहाडणे,नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.
कोपरगाव नगरपरिषदेने नुकतीच शहरातील सुमारे एकतीस रस्त्यांची कामे मंजुरीसह जवळपास एकोणतीस विषय मंजुरीसाठी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती त्यात भाजप कोल्हे गटाने शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांच्या मंजुरीसाठी आधी स्थायी व नंतर विशेष सर्वसाधारण सभेत कोलदांडा घातल्याने वादंग निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर नुकत्याच संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी भ्रष्ट नगरसेवकांचे नावे घेऊन आरोप करण्याचे आव्हान दिले होते.त्यावर पत्रकार परिषद घेऊन वहाडणे यांनी आपण कोल्हे गटाने मागणी केल्याप्रमाणे आता या पुढे पत्रकार परिषद घेऊनच भ्रष्ट नगरसेवकांची नावे जाहीर करू असे आव्हान दिले होते.त्या प्रमाणे आज दुपारी चार वाजता कोपरगाव नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज पत्रकार परिषदेचे आयोजन वरील माजी नगराध्यक्ष,नगरसेवक यांचेवर प्रतिहल्ला प्रतिहल्ला चढवला आहे.त्या नंतर हि आरोपांची मालिका सुरूच असून नुकतेच आ.काळे गटाने जिल्हाधिकारी यांना भेटून हि कामे मंजूर करण्याची मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर हा आरोप कोपरगाव नगरपरिषेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केला आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”काहीजण सदरचा रस्ता व्हावा म्हणून निवेदनावर जनतेच्या सह्या घेत आहेत असे समजते.त्यांना जनतेला असे भासवायचे कि,आमच्यामुळेच रस्ता होत आहे.त्यासाठी सह्यांची मोहिम राबवून केविलवाणे राजकारण सुरू आहे.कोल्हे गटाला खोट्या तक्रारी करायला,आरोप करायला वाव मिळू नये म्हणून या रस्त्याचे जीवन प्राधिकरणाला पाठविलेले अंदाजपत्रक परत बोलावून घेतले आहे.यानंतर तांत्रिक मान्यता मिळवण्यासाठी विलंब होणार आहे.त्याला जबाबदार कोल्हे गट व त्यांचे श्रेय वादाचे राजकारण आहे हे सर्व जनतेने लक्षात घ्यावे.बहुमताच्या जोरावर कामे नामंजूर करणाऱ्यांना जनतासुद्धा नामंजूर करणार असल्याचा दावा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी केला आहे.