जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

महावितरणचा भोंगळ कारभार,पूर्व कोपरगावातील शेतकरी त्रस्त

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

वर्तमानात महावितरण विभागाचा कारभार हा मोठ्या प्रमाणावर लहरी बनला असून शेतकरी या कारभाराला वैतागले आहे.याबाबत त्यांनी दहिगाव बोलका येथील विद्युत उपकेंद्रातील नादुरुस्त रोहित्राच्या तक्रारी करूनही काहीही उपयोग होत नसल्याचा व त्यामुळे उन्हाळी पिके हातातून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे सदर रोहित्र त्वरित दुरुस्त करुन मिळावे अशी मागणी दहिगाव बोलका,शिरसगाव,तीळवणी,सावळगाव,कासली,उक्कडगाव शेतकऱ्यांनी केली आहे.

दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीतील विद्युत उपकेंद्रातील विद्युत रोहित्र दि.२० मार्च पासून नादुरुस्त झालेले आहे.या बाबत वारंवार तक्रारी करूनही उपयोग झालेला नाही.त्यामुळे उन्हाळी पिकांचा हातातोंडाशी आलेला घास हिसकवाला जात आहे.त्यामुळे हा दहिगाव बोलका,शिरसगाव,तीळवणी,सावळगाव,कासली,उक्कडगाव आदी भाग अंधारात आहे.त्यामुळे हा खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत सुरळीत करावा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

महावितरण विभाग वर्तमानात विविध तक्रारींचा महापूर आलेला आहे.यात विविध रोहित्रे नादुरुस्त असणे ते वेळेवर दुरुस्त न करणे,त्यांच्या विद्युत वाहक तारा धोकादायक पातळीवर असणे,चुकीची वीजबिल देणे,नाव नसताना बिले देणे,अवास्तव बिले देणे असा कारभार सुरू असून या कारभाराची शेतकरी त्रस्त झाला आहे.अशीच घटना नुकतीच दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीतील विद्युत उपकेंद्राबाबत घडली असून सदरचे विद्युत रोहित्र दि.२० मार्च पासून नादुरुस्त झालेले आहे.या बाबत वारंवार तक्रारी करूनही उपयोग झालेला नाही.त्यामुळे उन्हाळी पिकांचा हातातोंडाशी आलेला घास हिसकवाला जात आहे.

त्यामुळे हा दहिगाव बोलका,शिरसगाव,तीळवणी,सावळगाव,कासली,उक्कडगाव आदी भाग अंधारात आहे.त्यामुळे हा खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत सुरळीत करावा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close