निवडणूक
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन ?

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी ११ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित १० जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या २७ उमेदवारांसाठी आज निवडणुक संपन्न झाली असून यात मोठी चुरस निर्माण झाली असून दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन घडले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली असून सत्ताधारी गटाकडून हा आकडा 25 हजार तर विरोधी गटाकडून ही रक्कम 15 हजार रुपयांपर्यंत असल्याची माहिती हाती आली आहे.दरम्यान यात सत्ताधारी गटात मोठी फूटतूट झाली असून त्याचा सत्ताधारी गटाला फटका असणार असल्याचे बोलले जात आहे.

या रणकंदनात शेवगाव येथील साखर सम्राटांच्या युवराजाने त्यांच्या काही सरदार-दरकदारांना हाताशी धरून कोपरगाव येथील सत्ताधारी (वर्तमान) भाजपच्या गटाच्या एका माजी व जेष्ठ नगराध्यक्षास आणि कोपरगाव शहराच्या पश्चिमेस रहिवासी असलेल्या ईशान्यगडास आधी इमान देणाऱ्या मात्र ते नंतर बदलणाऱ्या कार्यकर्त्यांचा वापर केला असल्याचे दिसून आले आहे.त्यांना त्यांच्या माजी नगराध्यक्षांच्या दिवट्याना हाती धरून आपले घोडे पुढे दामटले असल्याची मोठी चर्चा शहरात सुरू आहे.त्यांनी पॉवर हाऊस समोर असलेल्या एका सहकारी मजूर संस्थांच्या लेखा परीक्षकांच्या मदतीने काही संस्थांच्या मतदाराना आपल्या खोप्यात बोलवून हे लक्ष्मीदर्शन घडवले असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी ११ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित १० जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या २७ जणांनी आपले नशीब आजमावले असल्याचे दिसून येत आहे.त्यांचे नशीब आज अखेर पेटीबंद झाले आहे.अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या स्पर्धेत जिल्ह्यातील आजी-माजी आमदार,खासदार,त्यांचे युवराज,साखर कारखानदार असल्याने राज्याचे निवडणुकीकडे लागले आहे.या रणांगणात होत असलेल्या १० जागांमध्ये भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे,कॉंग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची युती ८ जागा तर शरद पवार गटाचे खा.नीलेश लंके व शिंदे गटाचे माजी खा.सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल ७ जागा तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट कर्जतमधील १ जागा लढवत असल्याचे दिसून आले आहे.दरम्यान यापैकी कोणत्याही पॅनलने अकोल्यात उमेदवार दिलेला नसल्याने त्या ठिकाणी स्वतंत्र लढत होत आहे.विखे-थोरात युतीचे या निवडणुकीत गुळपिठ होऊन त्यांच्या यापूर्वीच बिनविरोध झालेल्या १० जागा मिळवून त्यांची दहा बोटे तुपात असल्याचे दिसून आले आहे.बिनविरोधची एक जागा राम शिंदे गटाला मिळाली आहे.सेवा संस्थेच्या अकोले,कर्जत व पारनेर येथे चुरशीची लढत अपेक्षित आहे.दरम्यान या निवडणुकीत मोठी जुगलबंदी दिसून आली असून या स्पर्धेमुळे मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन झाले असल्याचे मतदार व सभासदांत बोलले जात असल्याचे दिसून आले आहे.त्याचा दर सत्ताधारी गटाने 25 हजारांनी फोडला असला तरी विरोधकांनी तो आदल्या दिवशीच 15 हजारांनी श्री गणेशा केला असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने पश्चिम गडाच्या जनसंपर्क कार्यालयास संपर्क करून संबंधित कर्मचाऱ्यास याबाबत विचारणा केली असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.मात्र आम्ही घटनास्थळी पोहचलो तेव्हा त्या ठिकाणी सर्व सामसुम झाले असल्याचा बचाव केला असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान या रणकंदनात शेवगाव येथील साखर सम्राटांच्या युवराजाने त्यांच्या काही सरदार-दरकदारांना हाताशी धरून कोपरगाव येथील सत्ताधारी (वर्तमान) भाजपच्या गटाच्या एका माजी व जेष्ठ नगराध्यक्षास आणि कोपरगाव शहराच्या पश्चिमेस रहिवासी असलेल्या ईशान्यगडास आधी इमान देणाऱ्या मात्र ते नंतर बदलणाऱ्या कार्यकर्त्यांचा वापर केला असल्याचे दिसून आले आहे.त्यांना त्यांच्या माजी नगराध्यक्षांच्या हिऱ्यामांनकांना हाती धरून आपले घोडे पुढे दामटले असल्याची मोठी चर्चा शहरात सुरू आहे.त्यांनी पॉवर हाऊस समोर असलेल्या एका सहकारी मजूर संस्थांच्या लेखा परीक्षकांच्या मदतीने काही संस्थांच्या मतदाराना आपल्या खोप्यात बोलवून हे लक्ष्मीदर्शन घडवले असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.त्यावेळी ही खबर दिनांक 31 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास पश्चिमगडाच्या कार्यालयास कळली होती.त्यांच्या धारणगाव रोड येथील कार्यालयातून काही कर्मचारी धावत पळत आले होते.त्यांनी आपल्या भ्रमणध्वनीद्वारे त्या ठिकाणचे चलचित्रण केले होते.दरवाजा बंद करून त्या ठिकाणची आहे ती रक्कमही ताब्यात घेतली असल्याची बातमी आहे.त्यानंतर त्या ठिकाणाहून पोबारा केला होता.मात्र जेऊर पाटोदा येथील एका दहशत करणाऱ्या इसमाची मदत घेऊन ती रक्कम पश्चिमगडाच्या नेत्यास आपल्या कर्मचाऱ्यास देण्यास भाग पाडले असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान या घटनेची माहिती कोपरगाव शहर पोलिसांना दिली गेली होती.त्या नंतर कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली होती.मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही.तोपर्यंत तेथील कार्यभाग उरकला गेला असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणाहून हात हलवत परतावे लागले असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान या निवडणुकीत शेती ३८३७ मतदार संगमनेर तालुक्यात सर्वाधिक ७१५ मतदार आहेत.कोपरगावमध्ये ५२९,नगरमध्ये ३९१,श्रीगोंद्यात २९९ मतदार आहेत.नेवासामध्ये २४६, अकोले २३१,पारनेर २२७,कर्जत १६८,श्रीरामपूर १४७,पाथर्डीत १३१,शेवगाव ११७ व जामखेडमध्ये ११५ मतदार आहेत.यात कोपरगाव निवडणूक केंद्रात आज दुपारी 04 वाजे पर्यंत अंतिम आकडेवारी हाती आली असून त्यात शेतीपूरक मतदारसंघात १७६ पैकी १७६ मतदान झाले आहे.या शिवाय सोसायटी मतदारसंघात १०९ पैकी १०८ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे तर या खेरीज बिगर शेती मतदार संघात २४४ पैकी २३६ मतदारांनी आपले अस्तित्व दाखवून दिले असल्याचे दिसून आले आहे.कोपरगाव येथील मतदार केंद्रात विभागीय अधिकारी संदीपकुमार रुद्राक्ष तर केंद्राधिकारी राजेंद्र रहाणे,संदीप नेरे आदींनी आपले कर्तव्य बजावले असून ही निवडणूक शांततेत पार पडली असल्याचे सांगितले आहे.



