जाहिरात-9423439946
निवडणूक

“यथा प्रजा..तथा राजा..”निवडणूक विशेष

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
      
     कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून यात कोणाचे घोडे पुढे जाणार; कोणाचे मागे राहणार याबाबत मतदारांत विविध तर्कवितर्क लढवले जात असून शहरात भाजप कोल्हे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराग संघान हे पालिकेच्या नगराध्यक्षपदाशी बहुमतासह ‘ संधान’ बांधणार असे जवळपास निश्चित मानले जात असून अजितपवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार थोड्या बहुत मतांनी पिछाडीवर राहण्याचा अंदाज व्यक्त होत असून त्यांसाठी भूतकाळातील काही घटनांचा आढावा घेतला असून तो संदर्भ तपासला तर कोणाही सुज्ञ वाचकाला तो पटल्याशिवाय राहणार नाही.दरम्यान या लढाईत विजय वहाडणे,राजेंद्र झावरे यांच्यात तिसऱ्यास्थानी राहण्याची स्पर्धा स्पष्ट दिसत असून शिवसेनेची अनेक छकले उडाली असल्याने शहर आणि तालुक्यासाठी आवश्यक असलेला तिसरा ध्रुव प्रस्थापितांनी मोडकळीस आणला असल्याचे दुर्दैवाने दिसत आहे.

नगराध्यक्ष पदांचे उमेदवार पराग संधान व ओमप्रकाश कोयटे.

  

“जिथे कारण नसताना एकाएकी अतिशय आदर केला जाऊ लागतो तिथे शंका घ्यावी नाहीतर दुःखद परिणामाला सामोरे जावे लागते याचा विचार नावात ‘ओम’ आणि ‘प्रकाश’ असलेल्या कोयटे यांना का शिवला नाही हे जरा आक्रितच मानले पाहिजे.मानसशास्त्र असे सांगते की,”ज्या वेळी सर्व परिस्थिती अत्यंत अनुकूल असते त्याच वेळी यशाच्या चाहुलीने मानवी मनातील कातरता उचल खाते आणि असे झाले की,ती व्यक्ती चुका करू लागते.याची तर ही प्रणिती नाही ही शंका घेण्यास मोठा वाव आहे.

  वर्तमानात राज्यातील 246 नगरपालिका व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली पहायला मिळत आहे.सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचारात व्यग्र आहेत.अशातच आता राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराच्या वेळेत बदल केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.याआधी 30 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रचाराची मुदत होती.मात्र आता यात वाढ करण्यात आली असून आता नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे.यामुळे अपक्ष उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.त्यानुसार मतदान सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजल्यापासून प्रचार पूर्णपणे बंद होईल.त्यानंतर प्रचारसभा,मोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही.त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारण करता येणार नाही.आता हा प्रचाराचा कलकलाट पक्षी दिवस मावळल्यावर जसा शांत होतो तसा 01 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता शांत होणार असून त्या दिवशी मतदारांना शांत झोप मिळण्यास मदत होणार आहे.कोपरगाव नगरपरिषद निवडणूक त्याला अपवाद नाही.कोपरगावात पारंपरिक विरोधक मानले गेलेले माजी आ.स्नेहलता कोल्हे व आ.आशुतोष काळे (यांचे उमेदवार पराग संधान व ओमप्रकाश कोयटे आदी म्हणण्यापेक्षा) हेच झालेल्या प्रचाराचे उमेदवार असल्याचे धुणीतून दिसून येत आहे.अख्खी निवडणूक,”आमच्या… दादाला तोडच नाय ! आणि ” कोपरगावच्या विकासाला विवेकच हवा …! अशा आशयाची होती म्हणून हा शब्द प्रपंच.

   नगराध्यक्ष पदांचे उमेदवार राजेंद्र झावरे व विजय वहाडणे.

 

या निवडणुकीत दुसरी ठसठसित समोर येणारी बाब म्हणजे यात बरेच उमेदवार अवैध व्यवसायाशी जोडलेले आहे.त्यात वाळू,मटका,गौण खनिज,पुरवठा विभागातील गैरव्यवहार,बँकाचे गैरव्यवहार,तर काहींवर दरोड्याचे गुन्हे असलेले उमेदवार या रिंगणात आहे.यात प्रत्येक उमेदवारावर किती गुन्हे आहेत याचा तपशील संबंधित निवडणूक यंत्रणेकडून मिळाला नाही व त्यांनी तशी वर्गवारी केलेली नाही.नाही तर तीही आकडेवारी चकित करणारी आणि बिहार आणि उत्तर प्रदेशची आठवण करून देणारी ठरली असती.

   वास्तविक ही निवडणूक विधासनभा पातळीवरच झाली असे म्हटले तर वावगे ठरू नये.सदर नगरपरिषदेची म्हणजे धाडसाचे ठरावे इतका प्रचार व्यक्ती आणि नेते केंद्री होता.शिवाय त्यांनी मतदारांना त्यांच्या उमेदवारांची नावे माहिती झाली असतील असे म्हणणे धाडसाचे ठरावे अशी स्थिती होती असो.पैशांच्या मोबदल्यात मते विकणाऱ्यांच्या भविष्यात दुसरे काय असू शकते.जशी वेळ येईल तसे त्यांना समजत चालणार आहे.आगामी काळात (आता बिहार नव्हे) पाकिस्तानसारखी परिस्थती न झाली तर नवल !एक नजर मतदारांनी चौकाचौकात लावलेल्या बॅनरवर टाकली तरी बरेच काही समजण्यासारखे आहे.सर्वच पक्षांनी आपल्या बॅनरवर उमेदवाराच्या छबी (फोटो) आधी स्वतःची छबी छापून आपणच या निवडणुकीचे कर्तेकरविते असल्याचे भासवले आहे.उमेदवारांना नगण्य समजण्याची वृत्ती यात (चूक केलेली) ढोबळ मानाने दिसून येत आहे.त्यामुळे आगामी काळात नगरपरिषदेच्या भाळी काय लिहून ठेवले आहे हे शहाण्या माणसाला सांगण्याची गरज नाही.

नगराध्यक्ष पदांचे उमेदवार सपना मोरे             व योगेश वाणी.

  

सन -2014 साली मात्र तत्कालीन आ.अशोक काळे यांच्या दहा वर्षाच्या कालखंडानंतर झालेल्या निवडणुकीत ऑक्टोबर 2014 साली त्यांचा पराभव झाला होता व त्यांच्या जागी कोल्हे घराण्याच्या सुनबाई स्नेहलता कोल्हे या दहा हजारांच्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या.त्यानंतर चमत्कारिकरित्या झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत माजी आ.काळे यांनी बाजी मारली असल्याचे दिसून येत आहे.मात्र खरी वास्तविकता ही नव्हती तर ;ती एक रेवडी कुस्ती होती असे पुढे उघड झाले होते.कारण आ.स्नेहलता कोल्हे यांच्या गटाने काळे गटाला पंचायत समिती निवडणुकीत बायपास देण्यासाठी मतदारांना त्या रात्री हात आखडता घेतला होता.त्यातून काळे गटाला सहज पंचायत समितीच्या सत्तेचा सोपान चढता आला होता हि येथे लक्षात येण्यासारखी गोष्ट.

   या निवडणुकीत दुसरी ठसठसित समोर येणारी बाब म्हणजे यात बरेच उमेदवार अवैध व्यवसायाशी जोडलेले आहे.त्यात वाळू,मटका,गौण खनिज,पुरवठा विभागातील गैरव्यवहार,बँकाचे गैरव्यवहार,तर काहींवर दरोड्याचे गुन्हे असलेले उमेदवार या रिंगणात आहे.यात प्रत्येक उमेदवारावर किती गुन्हे आहेत याचा तपशील संबंधित निवडणूक यंत्रणेकडून मिळाला नाही व त्यांनी तशी वर्गवारी केलेली नाही.नाही तर तीही आकडेवारी चकित करणारी आणि बिहार आणि उत्तर प्रदेशची आठवण करून देणारी ठरली असती.म्हणजे नेत्यांनी आता कार्यकर्ते जमिनीपासून बनविण्याचे कारखाने बंद केले असून पूर्वी ही बाब ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हापरिषदे पासून सुरू होत असे आता तसे चित्र उरले नाही.आता विविध स्वर्गीय नेत्यांच्या जयंत्या,पुण्यतिथ्या आणि नेत्यांचे वाढदिवसाचे बॅनर लावले,दहावे,तेरावे,वास्तुशांतीचे कार्यक्रम केले तरी तो कार्यकर्ता बनला जातो.तोच मजकूर व्हाट्सॲपवर प्रसारित केला की एखादा तरुण ‘ कार्यकर्ता ‘ या व्याख्येत गणला जातो.असे कार्यकर्ते आता प्रत्येक गल्लीत पायलीचे पन्नास झाले आहे.आणि त्यांना उमेदवाऱ्या सहज मिळू लागल्या आहेत.त्यागाची आणि समाजसेवची परंपरा असलेले उमेदवार आता इतिहास जमा झाले आहेत.या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी जवळपास सात जण रिंगणात असले तरी ज्या उमेदवारांत खरी लढत होणार असे गणले जाणारे उमेदवार वरील दोन सोडून माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,शिंदे सेनेचे उमेदवार व माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,उबठा सेनेच्या उमेदवार सपना मोरे या पाच जणांमध्येच होणार आहे.यातील भाजपचे गणले जाणारे निष्ठावान असणारे योगेश वाणी यांची उमेदवारी ही विजय वहाडणे यांची खोड जिरवणारी व मते विभाजित करणारी ठरणार असल्याने त्यांना राज्य पातळीवरील नेत्यांनी रणांगणात उतरवले गेले असल्याची शहरात जोरदार चर्चा आहे.त्याचा मतितार्थ वहाडणे नावाची जादू कमी करून शहरातील तिसऱ्या ध्रुवाला नेस्तनामुद करण्याच्या मुद्द्याशी संबधीत आहे.सुरुवातीला उबाठा सेना ही मुस्लिम मते बरीच ओढतील असा अंदाज असताना तशी वेळ येण्याची शक्यता कमी झाली आहे.त्यामुळे तीन क्रमांकाची मते मिळविण्यात वहाडणे आणि झावरे यांच्यात रस्सीखेच होणार असल्याचे उघड दिसून येत आहे.

दरम्यान यात आणखी एक घटक लक्षात घेण्यासारखा असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भरसभेत आणि समोर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी आ.कोल्हे आणि त्यांचे युवराज यांच्यात ‘आका’ आणि ‘काका’ वरून जी जुगलबंदी रंगली त्यात विखे यांनी आपण सज्जड दम भरत,”कोणी काहीही म्हणत असले तरी आपण कमळाचे (च) काम करणार असल्याची स्पष्टोक्ती केली आहे.त्यामुळे कोणी काही म्हणत असले तरी या विधानावर खुद्द ईशान्यगडच विश्वास ठेवू शकत नाही.कारण या युवराजाने गणेश निवडणुकीत विखेंची दुखरी नस दाबल्याची खदखद ते कधीही विसरणार नाही.त्यामुळे त्याची बेरीज ही आ.काळेनाच होणार हे उघड दिसत आहे.त्यामुळे ही लढत तुल्यबळ होणार हे उघड आहे.


  
   आता राहता राहिला प्रश्न भाजप कोल्हे गटाचे उमेदवार पराग संधान हे नगराध्यक्षपदाशी संधान बांधणार की,राष्ट्रवादीचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे त्या पदासाठी तोरण बांधणार हा यक्ष प्रश्न उरतो.यासाठी थोडे भूतकाळात डोकावे लागणार आहे.काळे कोल्हे संघर्ष खऱ्या अर्थाने होत होता तो 1995 पर्यंत.मात्र त्यांनी आगामी काळात आपली रणनीती बदलली असल्याचे दिसून येत आहे.त्यानंतरच्या झालेल्या निवडणुका संगनमताने होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे.सहकारी साखर कारखाना निवडणुका या नेत्यांत मिलीभगत होऊन बिनविरोध होऊ लागल्या होत्या.त्यातले त्यात 1997 ची शिर्डी विधानसभेची पोटनिवडणूक आ.राधाकृष्ण विखे यांनी लढवली ती काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेकडून.त्यावेळी त्यांना मदत केली ती त्यांचे श्वसुर नामदेवराव परजणे यांनी.त्याला तत्कालीन माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी (स्वतःचे नाशिकचे जावई वसंतराव पवार यांना मदत करूनही) हरकत घेतली होती.त्यातून त्यांच्यात चांगलेच बिनसले होते.परिणामी कोपरगावात संपन्न झालेल्या मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजीनामा देऊन राज्यात मुदतपूर्व विधानसभा निवडणूकांची घोषणा केली होती.त्यावेळी स्व.नामदेवराव परजणे यांनी शिवसेनेकडून आपला सवता सुभा उभा केला होता.त्यावेळी त्यांची चांगलीच हवा निर्माण झाली होती आणि तेच निवडून येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असताना शेवटच्या दिवशी माजी मंत्री कोल्हे आणि माजी खा.काळे यांनी नियोजितपणे एक डाव खेळला होता.त्यात स्वतःचे चिरंजीव अशोक काळे यांना पराभूत करून माजी मंत्री कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी स्वतःची हक्काची मते माजी मंत्री कोल्हे यांच्या पारड्यात टाकून ही लढाई कोल्हे यांना जिंकून दिली होती.(याला मराठी म्हणीप्रमाणे आपले नाक कापून अपशकुन करणे म्हणतात) पण नामदेवराव परजणे यांच्या रूपाने निर्माण होणारा तिसरा ध्रुव हाणून पाडला होता.तो पासून कोपरगाव तालुक्यात खऱ्या अर्थाने लोकशाहीचा खून पाडून रेवडी कुस्त्या सुरू झाल्या आणि मतदारांना मुर्खात काढण्याची (महान !) परंपरा निर्माण झाली आहे ती आजतागायत.आता दुसरे उदाहरण मागील अकरा वर्षापूर्वीचे देता येईल.कोपरगाव तालुक्यांतील काळे घराण्याला तीन पिढ्या एकदाही स्वतंत्रपणे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत सुरेगाव गट वगळता बहुमत जिंकता आलेल्या नाही.मात्र सन -2014 साली मात्र तत्कालीन आ.अशोक काळे यांच्या दहा वर्षाच्या कालखंडानंतर झालेल्या निवडणुकीत ऑक्टोबर 2014 साली त्यांचा पराभव झाला होता व त्यांच्या जागी कोल्हे घराण्याच्या सुनबाई स्नेहलता कोल्हे या दहा हजारांच्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या.त्यानंतर झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत माजी आ.काळे यांनी बाजी मारली असल्याचे दिसून येत आहे.मात्र खरी वास्तविकता ही नव्हती तर ;ती एक रेवडी कुस्ती होती असे पुढे उघड झाले होते.कारण आ.स्नेहलता कोल्हे यांच्या गटाने काळे गटाला पंचायत समिती निवडणुकीत बायपास देण्यासाठी मतदारांना त्या रात्री मोकळा हात सोडला नव्हता तर तो जाणीवपूर्वक आखडता घेतला होता.परिणामी काळे गटाने पंचायत समिती फत्ते केली होती हे उघड झाले होते.तो पासून आता तालुक्यात ही रेवडी संस्कृती चांगलीच फोफावली असल्याचे दिसून येत आहे.त्याची पहिली पोलखोल ही माजी खा.शंकरराव गडाख यांचे आत्मचरित्रात उघड झाली होती.त्यानंतर शंकरराव कोल्हे यांनीही आपल्या चरित्रात सांगितली आहेच.आता ती थेट आपल्या समोर विरोधी पक्षाचा उमेदवार कोण असावा हे ठरविण्यापर्यंत प्रगत झाली आणि मोठ्या उंचीपर्यंत पोहचली असल्याचे मतदारांच्या दुर्दैवाने दिसून येत आहे.सन-2024 ची विधानसभा निवडणूक त्या अर्थानेच घेतली होती.याआधी शिर्डीत असा अनुभव सन-2014 साली आला होता.आता हा फंडा आता राज्यात सर्रास वापरला जात आहे.मात्र त्याचे उगमस्थान हे कोपरगाव तालुक्यातून आहे हे विशेष !

   आता मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या घडामोडीचा घेऊ.जो पर्यंत शंकरराव कोल्हे हयात होते.तोपर्यंत त्यांनी विधानसभा निवडणूक सोडून देणे शक्य नव्हते.मात्र तो प्रताप कोल्हे घराण्याच्या नावावर गतवर्षी झालेल्या निवडणुकीत दिसून आला आहे.त्यांचे नातू विवेक कोल्हे यांनी तो आपल्या नावावर नोंदवला आहे.त्यांनी भाजप दिल्लीश्वरांच्या समोर नांगी टाकून आपली तलवार सपशेल म्यान केली होती.परिणामी विधानसभा राष्ट्रवादी अजित पवार गटाला महायुतीचा घटक असलेल्या आशुतोष काळे यांना आमदारकी देण्याची नामुष्की ओढवली होती.त्यांनीही आपली बोटं दगडाखाली अडकली असल्याचे भान ठेवून पीछे मूड केला होता.मात्र त्या मोबदल्यात आता आ.काळे तथा राष्ट्रवादी (अ.प.) गटाला कोल्हे गटाला स्थानिक स्वराज्य संस्था देण्याची वेळ आली असल्याचे मानले जात आहे.परिणामी हा दोन्ही घराण्याचा इतिहास पाहता नगरपरिषद ही कोल्हे गटाला आनंद गेली असल्याचे मानायला मोठी जागा आहे.आता कोणालाही वाटेल मग कोयटे यांच्या वाट्याला काय येणार आहे ? हा प्रश्न वाचकांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे.यासाठी सन-2014 च्या लोकसभा निवडणुकीत जो डाव माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखेंनी सेनेचे खा.वाकचौरे यांचेशी खेळला होता.त्यात, “तुम्ही काँग्रेसमध्ये या; तुम्हाला विजयी करू.तोच डाव आता कोपरगाव शहरात कोयटे विरुद्ध वापरला जाणार हे ओघाने आलेच.”आम्ही उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व कारखानदार काँग्रेसी असून आम्ही एकत्र आलो तर तुमचा काँग्रेसमध्ये आल्यास विजय निश्चित आहे आणि आम्ही तुम्हाला नक्की विजयी करू” असे गाजर दाखवले होते.आणि यदा कदाचित तुमचा पराभव झालाच तर तुम्हाला साई संस्थानचे अध्यक्षपद देणार आहेच ” असे लॉलीपॉप खा.वाकचौरे यांना देण्यास ही काँग्रेसी मंडळी विसरली नव्हती.खरे तर खा.वाकचौरे यांच्या पहिल्या निवडणुकीनंतर त्यांनी केलेली विस्मयकारक कामे अनेकांच्या डोळ्यातील कुसाळासारखी सलत होती.त्यांची पुन्हा विजयी मुसंडी प्रस्थापिताना धोक्याची वाटत असल्याने विश्वासघाताचे सर्व महाभारत घडवून आणले होते.

   दरम्यान दुसरी बाब या निवडणुकीत प्रस्थापित काळे आणि कोल्हे या दोन्ही नेत्यांनी ओबीसी नेत्यांनी आम्हाला आमच्या हक्काचे द्यायला हवे असा एल्गार बी.एस.एन.एल.चे संचालक रवींद्र बोरावके यांचेसह सासवड माळी समाजाने एक बैठक करूनही प्रथमच ओबीसी मतदारांना उमेदवारी दिलेली नाही असे म्हणण्यापेक्षा त्यांना सरळसरळ डावलले आहे.(कोयटे यांना ओबीसी समाज ओबीसी मानत नाही )तरीही त्यांचा कोल्हे गटाचे उमेदवार पराग संधान हे मोठया धीराने निवडणूक लढवत आहे.यामागील तर्कशास्र आणि नेत्यांचा पश्चात झाला असलेला ‘ खल’ बरेच काही सांगून जात आहे.

   दरम्यान प्रस्थापितांना आता कोयटे हे असेच डोळ्यातील कुसळ ठरले असून त्यांची 1200 कोटींची पतसंस्था आणि त्यांची राज्य पतसंस्था फेडरेशन,राष्ट्रीय पातळीवरील चळवळ,आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळणारी पदे ही प्रस्थापितांच्या डोळ्यात चांगलीच खुपत आहेत.त्यांच्या या हनुमान उड्या रोखणे आणि त्यांना त्यापासून त्यांना दूर करणे हे अनेक प्रस्थापिताना सोयिस्कर वाटत आहे.परिणामी त्यासाठी कोपरगाव नगरपरिषद निवडणूक ही प्रस्थापितांना प्रतापगडाची माची वाटत आहे.त्यामुळे ओमप्रकाश कोयटे हे तब्बल 76 व्या वर्षी आपल्या पाठीला तेल लावून दंडाच्या बेटकुळ्या का दाखवत आहे त्याचे उत्तर यात दडले आहे.”जिथे कारण नसताना एकाएकी अतिशय आदर केला जाऊ लागतो तिथे शंका घ्यावी नाहीतर दुःखद परिणामाला सामोरे जावे लागते याचा विचार नावात ‘ओम’ आणि ‘प्रकाश’ असलेल्या कोयटे यांना का शिवला नाही हे जरा आक्रितच मानले पाहिजे.मानसशास्त्र असे सांगते की,”ज्या वेळी सर्व परिस्थिती अत्यंत अनुकूल असते त्याच वेळी यशाच्या चाहुलीने मानवी मनातील कातरता उचल खाते आणि असे झाले की,ती व्यक्ती चुका करू लागते.क्रिकेटसह विविध खेळांच्या बाबतीत याचा अनुभव नित्य येत असतो.अशीच काहीशी बाब कोयटे यांचे बाबतीत झाली असण्यास जागा आहे.परिणामी वरील विवेचनावरून कोयटे ही त्यांच्या तुलनेने ही खालच्या पातळीवरील निवडणूक का लढवत आहे याचे उत्तर अनेक वाचकाना मिळाले असेल.आणि यदाकदाचित कोयटे यांचा या निवडणुकीत पराभव होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात असताना त्यांच्यासाठी प्रस्थापितांनी दुसरा सापळा रचून ठेवला असल्याचे दिसून येत असून त्यांना राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांनी महामंडळाचे अध्यक्षपदाचे गाजर डोळ्यासमोर वर टांगून ठेवले आहेच.त्यामुळे कोयटे यांचे भाळी पुढे काय वाढून ठेवले आहे याचा हा अंदाज असून असे घडले तर तो केवळ योगायोग समजावा इतकेच!

   भगवान श्रीकृष्णानी गीतेत एका ठिकाणी लिहून ठेवले आहे की,’खरा आनंद नष्ट करण्यात नसतो तर निर्माण करण्यात असतो खरी मजा तोडण्यात नाही तर जोडण्यात आहे.दुर्दैवाने कोपरगाव शहराची भूमी ही असुर गुरु शुक्राचार्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असल्याने वेगळी अपेक्षा करण्यात सार नाही असेच म्हणावे लागेल कारण या भूमीत चांगले बीज अंकुरत नाही आणि यदाकदाचित अंकुरले तर त्याला योग्य वातावरण मिळत नाही परिणामी ते फळण्याफुलण्या आधीच कोमेजले जातात हे वेगळे सांगणे न लगे.कारण प्रस्थापितांच्या तुलनेत माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे आणि राजेंद्र झावरे यांनी आपल्या कालखंडात केलेली कामे जनतेने विसरावी अशी नक्कीच नाही.आणि विसरली तर ते आक्रितच मानले पाहिजे,परिणामी त्यांना कमी मते मिळाली तर येथील मतदारही रोज मरण्याच्या लायकीचे असल्याचे उघड होणार आहे आणि त्यांना त्याची किंमत त्यांना आगामी काळात मोजावी लागली तर नवल वाटून घेऊ नये.पूर्वी या देशात,”यथा राजा तथा प्रजा” पण स्वातंत्र्य मिळाल्यावर राजाचा जन्म मतपेटीतून होऊ लागल्याने ती,”यथा प्रजा (मतदार) तथा राजा” (लोकप्रतिनिधी) अशी झाली आहे.त्यामुळे मतदारांना प्रस्थापितांना एकतर्फी दोष देता येणार नाही.परिणामी त्यांनी हे ही वास्तव विसरू नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close