आरोग्य
कोपरगाव रुग्णवाढ थांबणार कशी ?

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०३ हजार ७०९ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ३३३ असून आज पर्यंत ४९ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.३२ टक्के आहे.तर एकूण २२ हजार ९३८ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ९१ हजार ७५२ असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १६.१७ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार ३२७ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ८९.७० टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.आज आलेल्या आकडेवारीने काहीसा दिलासा मिळाला आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ८३ हजार २२१ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०३ हजार ८१३ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ७८ हजार २२३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार १८४ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण-२८ बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.
कोपरगाव शहरात आज आलेल्या एकूण-१२ बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.समता नगर पुरुच वय-५०,कोपरगाव पुरुष वय-६४,महिला वय-३०,०५,३४,खडकी पुरुष वय-६०,निवारा महिला वय-६३,दत्तनगर महिला वय-२४,मोहिनीराज नगर पुरुष वय-६०,संजीवनी कारखाना पुरुष इंदिरानगर पुरुष वय-५४,रिद्धीसिद्धी नगर पुरुष वय-५२ आदींचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यातील एकूण १६ रुग्ण आहे.त्यात वारी पुरुष वय-७०,२४,महिला वय-२०,१९,४०,७०,शिंगणापूर महिला वय-२४,संवत्सर पुरुष-२४,कोकमठाण पुरुष वय-३५,चांद गव्हाण पुरुष वय-७५,जंगली महाराज आश्रम पुरुष वय-४५,२४,३५,महिला वय-३५,३०,माहेगाव देशमुख पुरुष वय-४० आदींचा समावेश आहे.
दरम्यान कोरोना वाढीचा दर पुन्हा गतवर्षीप्रमाणे उच्चान्क गाठतो का असा संभ्रम तयार झाला होता तो दोन दिवसांपासून मोडीत निघाला आहे.आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असल्याचे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.सरकारने तसे नुकतेच नवीन नियम जाहीर केले आहे.