निवडणूक
जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षकांची स्ट्रॉंगरूमला भेट

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कोपरगाव येथील राम मंदिर परिसरातील सेवा निकेतन स्कूल येथील स्थापन केलेल्या स्ट्रॉगरूमला भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली आहे.

दरम्यान कोपरगाव विधानसभा निवडणुकीत आज पर्यंत पाच नामनिर्देशन पत्र दाखल झाले असून यात सामाजिक कार्यकर्ते संजय काळे,शिवाजी कवडे,अहिरे आदींचा समावेश आहे.
यावेळी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था,ईव्हीएम यंत्राचे वाटप व मत मोजणीच्या दिवशी जागेचे नियोजन याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली.प्रशासनाच्या सर्व विभागांच्या निवडणूकविषयक तयारीचा आढावा व कामकाजाची पाहणी करून निवडणूक आचारसंहितेच्यादृष्टीने त्यांनी सूचना दिल्या. निवडणूक आयोगाच्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.पोलिस अधीक्षक ओला यांनी ईव्हीएम सुरक्षिततेच्या दृष्टीने स्ट्रॉगरूमचे ठिकाण व परिसराची पाहणी केली आहे.

यावेळी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत,शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने,पोलीस निरीक्षक भगवान मथुरे,संदीप कोळी,गटविकास अधिकारी संतोष राऊत,कोपरगाव नगरपंचायत मुख्याधिकारी सुहास जगताप,निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते,महसूल नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे आदी मान्यवर उपस्थित होते.