जाहिरात-9423439946
निवडणूक

शिर्डीत लढतीचे चित्र स्पष्ट…इतके उमेदवार निवडणूक लढणार !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   शिर्डी लोकसभेत छाननी अंती २२ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरले होते.आज,२९ एप्रिल रोजी माघारीची अंतिम मुदतीत  ९ उमेदवारांनी माघार घेतली आहे. प्रत्यक्षात २० उमेदवार शिर्डी लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहेत.यात प्रामुख्याने हि लढत तिरंगी होणार असल्याचे दिसत आहे.

माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटामध्ये परतले आहेत.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वतीने खा.सदाशिव लोखंडे हे तिसऱ्यांदा हि निवडणूक लढवत आहे.त्यामुळे या दोन आजी-माजी खासदारांत हि निवडणूक रंगणार असल्याचं उघड झाले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ. कोपरगाव लोकसभा मतदारसंघाच्या विभाजनानंतर २००८ मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला.

मतदारसंघाच्या निर्मितीपासून म्हणजे २००९ पासून शिवसेनेचं या मतदारसंघावर वर्चस्व पाहायला मिळालं आहे.पण शिवसेनेतील फुटीनंतर या मतदारसंघात यंदा ‘शिवसेना’ विरुद्ध ‘शिवसेना’ म्हणजेच ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी लढत होत आहे.दरम्यान या निवडणूची जिंकण्याची जास्त शक्यता असलेले सेनेचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव साधर्म्य असलेले अन्य एक उमेदवार उभा करण्याची किमया सत्ताधारी गटाने दक्षिणेसारखी शिर्डीत केली आहे.मतदारांना गोंधळात टाकण्याचे काम केले आहे.

  दरम्यान २०१४ मध्ये उमेदवारीसाठी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेलेले माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटामध्ये परतले आहेत.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वतीने खा.सदाशिव लोखंडे हे तिसऱ्यांदा हि निवडणूक लढवत आहे.त्यामुळे या दोन आजी-माजी खासदारांत हि निवडणूक रंगणार असल्याचं उघड झाले आहे.
दरम्यान शिर्डीच्या या राजकिय आखाड्यात या दोन प्रमुख उमेदवारांसह सना मोहंमद अली सय्यद (अपक्ष) व संजय हरिश्चंद्र खामकर (बळीराजा पार्टी) या उमेदवारांनी माघार घेतली आहे.तर भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे),रामचंद्र नामदेव जाधव (बहुजन समाज पार्टी), लोखंडे सदाशिव‌ किसन (शिवसेना),उत्कर्षा प्रेमानंद रूपवते (वंचित बहुजन आघाडी),ॲङ नितीन दादाहरी पोळ (बहुजन भारत पार्टी),भारत संभाजी भोसले (समता पार्टी),राजेंद्र रत्नाकर वाघमारे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी),अभिजीत अशोकराव पोटे (अपक्ष), अशोक रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी),खरात नचिकेत रघुनाथ (अपक्ष),खाजेकर विजयकुमार गोविंदराव (अपक्ष),गंगाधर राजाराम कदम (अपक्ष),चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष),प्रशांत वसंत निकम (अपक्ष), बागुल गोरक्ष तान्हाजी (अपक्ष),भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे (अपक्ष),रविंद्र कलय्या स्वामी (अपक्ष), सतिष भिवा पवार (अपक्ष),अॅड. सिध्दार्थ दिपक बोधक (अपक्ष) व संजय पोपट भालेराव (अपक्ष) हे उमेदवार निवडणूक लढणार असल्याचे चित्र आज उघड झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close