जाहिरात-9423439946
निवडणूक

निवडणूक पथकाची कारवाई,मोठी रक्कम जप्त !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


  श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे निवडणूक भरारी पथकाने १ लाख १९ हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे.रविवारी दि.२८ एप्रिल रोजी दुपारी २.४५ वाजता ही कारवाई करण्यात आल्याने बेजबाबदार नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

  

सदरचे पथक हि नियमित तपासणी करत असताना नेवासा-श्रीरामपूर रोडवर नेवासाकडून श्रीरामपूर कडे येणाऱ्या गाड्यांची तपासणी करत असतांना टाकळी भान येथे एका चारचाकी गाडीतून ही १.१९ लाखांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

  वर्तमानात शिर्डी लोकसभा निवडणुक सुरु असून ती येत्या १३ मे रोजी संपन्न होत आहे.त्यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी सतर्क झाले असून त्यांनी ठिकठिकाणी आपली पथके रवाना केली असून रस्त्यावरील संशयास्पद गाड्यांची तपासणी होत आहे.दरम्यान या पथकातील दिनकर सचिन सुरेश यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत पथकाने टाकळी भान येथे ही कारवाई केली आहे.
  सदरचे पथक हि नियमित तपासणी करत असताना नेवासा-श्रीरामपूर रोडवर नेवासाकडून श्रीरामपूर कडे येणाऱ्या गाड्यांची तपासणी करत असतांना एका चारचाकी गाडीतून ही रक्कम हस्तगत करण्यात आली.निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ५० हजार रुपयांच्या वरील रकमेचा हिशोब संबंधितास व्यवस्थित न देता आल्यास सदर रक्कम जमा करण्यात येत असते. 

  शिर्डी लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी दंडाधिकारी दिनकर सचिन सुरेश यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई अमोल शरद लांडे,सोमनाथ तुळशीराम बलमे,व्हिडिओग्राफर समीर हमीद शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close