नदी प्रदूषण
दूषित पाणी,ग्रामस्थांना त्वचा रोग,प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव आणि येवला तालुक्यातील सीमारेषेवर असलेल्या नाटेगाव,बदापूर,नांदेसरसह सहा गावातील भूजल प्रदूषित करणाऱ्या रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपनीचा प्रश्न शेतकरी संघटनेने ऐरणीवर आणल्यानंतर आज नाशिक येथील प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली असता त्या ठिकाणी असलेल्या महिलेने दूषित पाण्यामुळे आपल्याला त्वचा रोग जडला असून कंपनीने सुरू केलेल्या विहिरीच्या स्फोटामुळे आपल्या घराला तडे गेले असून आपले निवासस्थान धोक्यात आले असल्याचे निवेदन देऊन या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान याबाबत नाटेगाव,बदापूर,नांदेसर आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी प्रदूषण महामंडळाच्या नाशिक येथील कार्यालयाकडे तक्रार केली असून त्याची पाहणी करण्यासाठी आज समक्ष क्षेत्रीय अधिकारी मनीष महाजन व अन्य एक अशा दोघा अधिकाऱ्यांनी भेट दिली असून त्यांनी आज वरील गावांना भेट दिली असून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतली आहे.व त्याबाबत शेतकऱ्यांना आश्र्वासित केले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”येवला तालुक्यातील नांदेसर शिवारात मेसर्स कृष्णा एन्झायटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सन-२०१२ साली स्थापना करण्यात आली होती.या ठिकाणी कंपनी विषारी रासायनिक पदार्थांचे उत्पादन करत आहे.आणि त्याचे सांडपाणी कोपरगाव आणि येवला तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नांदेसर,नाटेगाव,बदापूर,पिंपळगाव जलाल,येसगाव,खिर्डी गणेश आदी सहा गावातील नैसर्गिक ओढ्यात सोडून देण्यात येत आहे.परिणामी या ओढ्यातील कंपनीने सोडून दिलेले पाणी नजीकच्या विहिरीत उतरत असून येथील कृषीक्षेत्र धोक्यात आले आहे.शिवाय भूजल दूषित झाले आहे.परिणामी या दूषित पाण्यामुळे नजीकच्या शेत तलावातील मासे मृत झाले असल्याच्या बातम्या या पूर्वीच ‘ न्युजसेवा ‘ या वेब पोर्टलवर मे महिन्यात प्रसिद्ध झाल्या आहेत.हेच पाणी पुढे गोदावरी नदीत प्रवाहित होत असून हेच पाणी जायकवाडी धरणात जात असून पुढील लाखो शेतकऱ्यांना ते कृषी आणि पिण्याचे पाण्यासाठी वापरले जात आहे.शिवाय आगामी काळात सिंहस्थ पर्वणी आली असताना याच पाण्यात भाविक भक्त पवित्र स्नान करणार आहे.त्यात श्री क्षेत्र सरला बेट आणि पुढे नेवासा येथील किसनगिरी महाराज यांचे संस्थान,राक्षसभुवन आणि पुढे जायकवाडीचा १०२ टी.एम.सी.चा जायकवाडीचा मोठा जलाशय आहेत्यामुळे मोठा धोका वाढून ठेवला असल्याचे प्रसिद्ध केले होते.याबाबत नाटेगाव,बदापूर,नांदेसरसह सहा गावातील भूजल प्रदूषित करून शेती क्षेत्र उध्वस्त करणाऱ्या संबंधित कंपनीच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी एल्गार केला असून प्रदूषण महामंडळाच्या नाशिक येथील कार्यालयाकडे तक्रार केली असून त्याची पाहणी करण्यासाठी आज समक्ष क्षेत्रीय अधिकारी मनीष महाजन व अन्य एक अशा दोघा अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.त्यावेळी येवला तालुक्यातील बदापूर येथील संबंधित महिला काजोल शिवाजी अभंग यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नाशिक येथील प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी मनीष महाजन यांना दिले आहे व त्याबाबत सविस्तर चर्चा केली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की,”आपण मे.कृष्णा एन्झायटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मागील बाजूस राहत असून कंपनीचे प्रदूषित पाणी आमचे पिण्याचे पाण्याचे स्रोतात मिसळले आहे.त्यामुळे ते दूषित झाले आहे.ते पाणी आम्ही अंघोळीसाठी आणि घरासाठी नियमित सांडपाणी वापरत आहे.त्यामुळे मला पोटाचे आणि त्वचेचे गंभीर आजार झाले असल्याचे निदान झाले आहे.परिणामी माझे आणि माझ्या परिवाराचे आरोग्य धोक्यात आले आहे.त्यासाठी कृष्णा एन्झायटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कायमस्वरूपी बंद करण्यात यावी.याशिवाय कंपनीचे आवारातील अवैध विहिरींचे उत्खनन होत असल्याने आपल्या घराला हादरे बसत असून आपल्या राहत्या घराच्या भिंतीला तडे गेले आहे.तसेच परिसरातील अन्य घरांना त्याचा धोका उद्भवू शकतो असा इशारा देऊन या विहिरींचे खोदकाम तत्काळ बंद करावे अशी मागणी शेवटी केली आहे.



