दुष्काळ
आनंदाचा शिधा शेतकऱ्यांची उमेद वाढवणारा-खा.वाकचौरे

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राज्य सरकारने ‘आनंदाचा शिधा’ योजना बंद केल्यामुळे,राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (शिंदे सेना) दुष्काळग्रस्त आणि गरजू कुटुंबांसाठी स्वतःहून ‘आनंदाचा शिधा’ वाटप उपक्रम सुरू केला असून गरजू महिला आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यास व उमेद वाढविण्यास मदत मिळणार असल्याचे प्रतिपादन शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी नुकतेच जवळके येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जवरे यांच्या प्रयत्नातून जवळके ग्रामपंचायत विकास कामाला अभूतपूर्व व मोठी मदत केली असून त्यात त्यांनी जिल्हा परिषद शाळेला तीन खोल्या मंजूर केल्या असून एक अंगणवाडी इमारत,दोन रस्ते आदीना मोठा निधी दिला आहे.या अनेक कामे अद्याप प्रगतीपथावर असून ती लवकरच मार्गी लावणार आहे.त्यावेळी लवकरच त्यांचे दिवाळीनंतर उद्घाटन करण्यात येणार आहे.शिर्डीला सर्वात जवळचा ठरणारा रस्त्यासाठी निधीची गरज असून त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असून आगामी काळात तो रस्ता मागील लागणार असल्याचे सुतोवाच केले आहे”- एस.के.थोरात,माजी उपअभियंता,जलसंपदा विभाग व जेष्ठ कार्यकर्ते,जवळके.
याशिवाय दसरा मेळाव्यात केलेल्या घोषणेनुसार,शेतकऱ्यांच्या मुलांना सायकली,महिलांना शिलाई यंत्रे आणि सिंहस्थ पर्वकाळात आखाड्यांना मोफत भोजन देण्याची घोषणाही शिंदे सेनेने केली आहे.या शिवाय राज्य सरकारने ‘आनंदाचा शिधा’ योजना बंद केल्यामुळे,राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (शिंदे सेना) दुष्काळग्रस्त आणि गरजू कुटुंबांसाठी स्वतःहून ‘आनंदाचा शिधा’ वाटप उपक्रम सुरू केला आहे.कोपरगाव तालुक्यातील जवळके,धोंडेवाडी,बहादराबाद,बहादरपूर,वेस या गावातील गरजु महिलाना शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शुभ हस्ते याचा लाभ देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी शिवसेनेचे ग्राहक संघटनेचे माजी जिल्हा प्रमुख मुकुंद सिनगर,जलसंपदा विभागाचे माजी उपअभियंता एस.के.थोरात,सरपंच सारिका विजय थोरात,माजी उपसरपंच डी.के थोरात,विजय थोरात,ग्रामपंचायत सदस्य मीना विठ्ठल थोरात,इंदुबाई नवनाथ शिंदे,वनिता रखमा वाकचौरे,अरुण थोरात,वाल्मीक नेहे,अशोक शिंदे,नरहरी पाचोरे,संजय सरवार आदीसह जवळके,धोंडेवाडी,बहादरपुर,बहादराबाद,वेस आदी गावातील गरजू महिला उपस्थित होत्या.
सदर प्रसंगी प्रास्ताविक एस.के.थोरात यांनी केले असून त्यांनी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जवरे यांच्या प्रयत्नातून जवळके ग्रामपंचायत विकास कामाला अभूतपूर्व व मोठी मदत केली असून त्यात त्यांनी जिल्हा परिषद शाळेला तीन खोल्या मंजूर केल्या असून एक अंगणवाडी इमारत,दोन रस्ते आदीना मोठा निधी दिला आहे.या अनेक कामे अद्याप प्रगतीपथावर असून ती लवकरच मार्गी लावणार आहे.त्यावेळी लवकरच त्यांचे दिवाळीनंतर उद्घाटन करण्यात येणार असून खा.वाकचौरे यांना त्याचे निमंत्रण दिले आहे.शिर्डीला सर्वात जवळचा ठरणारा रस्त्यासाठी निधीची गरज असून त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असून आगामी काळात तो रस्ता मागील लागणार असल्याचे सुतोवाच केले आहे.या शिवाय तळेगाव दिघे या प्रलंबित रस्त्यासाठी त्यांचे मोठे प्रयत्न सुरू आहे.त्यांनी यावेळी शिर्डी-वावी या मार्गावर राज्य परिवहन मंडळाची एकही बस नसल्याचे ग्रामस्थांचे मोठे हाल होत असल्याने या मार्गावर शटल बस सुरु करणेची मागणी केली आहे.या शिवाय निळवंडे प्रकल्पास केंद्र सरकारकडून गती दिली असून ग्रामपंचायतीच्या कामाला मोठे प्रोत्साहन दिले असल्याचे सांगून आनंदाचा शिधा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दुष्काळात शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा एक प्रयत्न असून तो कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले आहे.त्यावेळी त्यांनी उपस्थित महिलांनी संजय गांधी निराधार योजनांचा फायदा घेण्याचे आवाहन केले आहे.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद सिनगर यांनी केले आहे.तर खा.वाकचौरे यांचेसह उपस्थितांचे आभार सरपंच सारिका थोरात यांनी मानले आहे.



