दुष्काळ
तालुक्यातील जलजीवन योजना पूर्ण करणार …या आमदारांची माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील अपूर्ण आणि गैरव्यवहाराने त्रस्त जल जीवन योजना पूर्ण करण्यासाठी आपण केंद्रीय जलसंधान मंत्री सी.आर.पाटील यांची भेट घेतली असून ती कामे दुष्काळाचे पार्श्वभूमीवर लवकरच पूर्ण केली जातील असे आश्वासन कोपरगाव विधानसभेचे आ.आशुतोष काळे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत विधान परिषदेचे आ.विवेक कोल्हे यांनी दिले आहे.

दरम्यान तालुक्यातील काळे आणि कोल्हे या दोन्ही तरण्याबांड आमदारांची एका सार्वजनिक व्यासपीठावर आढावा घेण्याची ही पहिलीच बैठक होती.त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या मांडताना बरीच सावधगिरी बाळगली असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे अमुक काम आ.काळे यांच्यामुळे झाले असल्याचे म्हणण्याचे धाडस अनेकांना झाले नाही.तीच बाब कोल्हे गटांच्या कार्यकर्त्यांना आपल्या तोंडाला बोलताना बराच आळा घालावा लागला आहे.परिणामी श्रेय देताना दोन्ही आमदारांमुळे अमुक काम मार्गी लागले असा मोठा सावध पवित्रा त्यांनी घेतला आहे.त्याची उपस्थितांत चांगलीच चर्चा झाली असल्याचे दिसून आले आहे.
महाराष्ट्रात दीर्घकाळापासून पावसाने ओढ दिल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून राज्य सरकार सतर्क झाले आहे.सप्टेंबर २०२६ मध्ये राज्यातील बहुतांश भागांत, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात ३५ ते ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाचा खंड पडल्यामुळे कापूस,सोयाबीन आणि मक्यासारखी खरीप पिके जळून खाक झाली आहेत.या गंभीर संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तातडीने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.दुष्काळ निवारणाच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि तातडीने निर्णय घेण्यासाठी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे.मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार येत्या तीन दिवसांत दुष्काळाबाबतची पहिली अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आज तहसील कार्यालयात आ.आशुतोष काळे व विधान परिषदेचे आ.विवेक कोल्हे,यांचे प्रमुख उपस्थितीत आज दुपारी ३.३० वाजता एका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कोपरगाव नगरपरिषद मुख्याधिकारी निकत यांनी कोपरगाव शहराला पाणी कमी पडणार नसल्याची माहिती दिली आहे.नवीन पाणी योजनेत १५००-१६०० कनेक्शन जोडले गेले बाकी नागरिकांना स्वखर्चाने जोडावे लागतील.तर जुन्या योजनेत जलमापक लागले का ? अशी नेमकी चौकशी आ.कोल्हे यांनी प्रशांत वाबळे यांना केली.त्यावेळी त्यांनी नकार दिला आहे.त्यावेळी आ.कोल्हे यांचे चेहऱ्यावर असणारे हास्य तथा त्यांची देहबोली उपस्थियांचे लक्ष वेधून घेत होते.त्याची कोपरखिळी न बोलताही अर्थातच काळे गटाला होती हे उघड आहे.
सदर प्रसंगी कोपरगावचे प्रांताधिकारी धनंजय बांगर,तहसीलदार महेश सावंत,कोपरगाव नगरपरिषद मुख्याधिकारी संदीप निकत,नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते,गटविकास अधिकारी स्वप्नील वाळुंज,सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप दळवी,बांधकाम विभागाचे उपअभियंता दहिफळे,कृषी अधिकारी मनोज सोनवणे,पशु संवर्धन अधिकारी श्रद्धा काटे,विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

कोपरगाव तालुक्यात एकूण ७६ टक्के २८० मि.मी.पाऊस झाला आहे.शेवटचा पाऊस २६ जून रोजी झाला असल्याची माहिती दिली आहे.दरम्यान यावेळी पावसाने २०-४० दिवसांचा खंड दिला असल्याचे सांगितले आहे.आणेवारी ५१ पैसे दिली असल्याची माहिती तहसीलदार सावंत यांनी दिली आहे.त्याला काळे गटाचे कार्यकर्ते प्रशांत वाबळे यांनी जोरदार हरकत घेतली होती.त्यावेळी त्यांनी पुढील काळात ती कमी होऊ शकते असे स्पष्ट केले आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक तहसीलदार महेश सावंत यांनी केले त्यांनी कोपरगाव तालुक्यात एकूण ७६ टक्के २८० मि.मी.पाऊस झाला आहे.शेवटचा पाऊस २६ जून रोजी झाला असल्याची माहिती दिली आहे.दरम्यान यावेळी पावसाने २०-४० दिवसांचा खंड दिला असल्याचे सांगितले आहे.आणेवारी ५१ पैसे दिली असल्याची माहिती तहसीलदार सावंत यांनी दिली आहे.त्याला प्रशांत वाबळे यांनी जोरदार हरकत घेतली होती.त्यावेळी त्यांनी पुढील काळात ती कमी होऊ शकते असे स्पष्ट केले आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की,”त्यामुळे पिकांची परिस्थिती खालावली आहे.भूजल पातळी,रोजगाराची स्थिती,पीक स्थिती याबाबत सरकारने अहवाल मागितला आहे.शेतकऱ्यांचे स्थलांतर किती झाले,ट्रिगर टु मधून ट्रिगर थ्री मध्ये किती गावे जात आहे.याची माहिती मागितली आहे.वर्तमानात कोपरगाव तालुक्यातील पिकांची स्थिती खालावली आहे.चारा पिकांची स्थिती सादर केली आहे.०८-०९ महिने चारा पुरवला जाऊ शकतो अशी माहिती तालुका पशु संवर्धन अधिकारी श्रद्धा काटे यांनी दिली असताना आ.काळे यांनी त्याचे खंडन केले आहे.तालुक्यात १२ हजार ७६७ पशुधन असल्याची माहिती दिली आहे.चारा उत्पादनासाठी बियाणे पुरवणार आहे.
दरम्यान यावेळी जलजीवन योजनेचे प्रभारी उपअभियंता अश्विन वाघ यांनी माहिती दिली आहे.त्यात काकडी,मल्हार वाडी,रांजणगाव देशमुख,अंजनापूर,शिरसगाव, तिळवणी,सावळगाव,उक्कडगाव आदी गावांना टँकरने पाणी पुरवण्याचे नियोजन आहे.टंचाई काळात पाणी पुरवण्यासाठी विहिरी अधिग्रहित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.मात्र यात अद्यावत माहिती घेऊन ती पुरवली जाईल अशी माहिती वाघ यांनी दिली आहे.या शिवाय आगामी काळात गोदावरी उजवा, डावा कालवा,पालखेड कालवा,आणि निळवंडे कालव्याचे आवर्तन कधी येणार याची माहिती घेऊन त्यानुसार नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान यावेळी जीवन प्राधिकरणाकडे १५ योजना ताब्यात असून कामे सुरू असल्याची माहिती त्या कोपरगाव उपविभागाचे शाखा अभियंता सुनील हरदास यांनी दिली आहे.यातील बहुतांशी कामे 75 ते 80 टक्क्यांचे पुढे झाली आहे.ती कामे मार्गी लावण्यासाठी वाढीव अंदाजपत्रके बनवून शासनस्तरावर मंजुरीसाठी पाठवली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.यावेळी शिंगणापूर येथील कॉन्ट्रॅक्टर पळून गेला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.त्यावेळी आ.कोल्हे यांनी मोठे गाव असून ते काम तातडीनं पूर्ण करा अशी सूचना त्यांना केली आहे.
दरम्यान त्यावेळी आ.कोल्हे यांनी,”जीवन प्राधिकरण आणि जलजीवन योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप केला आहे.त्यावेळी उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकारी आणि नागरिकांनी त्यास दुजोरा दिला आहे.
यावेळी गोदावरी कालव्यांचे दोन रब्बी एक उन्हाळ्याचे आवर्तन देण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव उपविभागाचे अभियंता संदीप पाटील यांनी दिली आहे.०९ टी.एम.सी.पाणी साठा वापरण्यास राहणार आहे.१५ सप्टेंबरच्या पाणी साठ्यानुसार एक बिगरसिंचन पाणी आवर्तन होणार आहे.दरम्यान अद्याप हा पाणी अंतिम निर्णय हा १५ ऑक्टोबरच्या उपलब्ध धरण साठ्यानुसार ठरत असतो अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.जलसंधारण कामे करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.मात्र यावेळी जलसंधारण अधिकाऱ्यांनी या बैठकीस दांडी मारली असल्याचे उघड झाले आहे.मात्र आमदार महोदय यांचे लक्ष वेगळ्या मुद्द्यावर गेल्याने तो विषय अलगत मागे पडला असल्याचे उघड झालं आहे.दरम्यान यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावण्यासाठी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी आपल्या भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अन्य विषयांच्या प्रवाहात वाहून गेला असल्याचे दिसून आले आहे.
यावेळी कोपरगाव नगरपरिषद मुख्याधिकारी निकत यांनी कोपरगाव शहराला पाणी कमी पडणार नसल्याची माहिती दिली आहे.नवीन पाणी योजनेत १५००-१६०० कनेक्शन जोडले गेले बाकी नागरिकांना स्वखर्चाने जोडावे लागतील.तर जुन्या योजनेत जलमापक लागले का ? अशी नेमकी चौकशी आ.कोल्हे यांनी प्रशांत वाबळे यांना केली.त्यावेळी त्यांनी नकार दिला आहे.त्यावेळी आ.कोल्हे यांचे चेहऱ्यावर असणारे हास्य तथा त्यांची देहबोली उपस्थियांचे लक्ष वेधून घेत होते.त्याची कोपरखिळी न बोलताही अर्थातच काळे गटाला होती हे उघड आहे.त्यावेळी आगामी दहा महिन्यानंतर जर या नियोजनात फरक पडला तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असा इशारा आ.काळे यांनी दिला आहे.त्यावेळी अधिकारी सटपटले असल्याचे दिसून आले आहे.त्यांनी आपण माहितीचे अद्यावतीकरण करून आपल्याला देत असल्याचा बचाव केला असल्याचे दिसून आले आहे.
यावेळी शिंगणापूर शिवारात २३ व २८ नंबर चारीस पाणी येत नसल्याचा आरोप उपस्थित शेतकऱ्यांनी केला आहे.चारी दुरुस्त्या कागदोपत्री होतात पण प्रत्यक्षात होत नाही.चारीस गेट नसल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे आपल्या भागातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यावेळी राजेंद्र खिल्लारी यांनी कालव्यांचे अस्तरीकरण सदोष झाले असल्याचा आरोप केला आहे.त्यावेळी कलवड तुटले तर जबाबदार कोण आहे”असा कडवा सवाल केला आहे.सदर काम कृपानिधि कन्ट्रक्शन या एजन्सीने काम घेतले असल्याची माहिती उपस्थित उपअभियंता यांनी माहिती दिली आहे.दोन्ही (आ.काळे आणि कोल्हे )आमदारांनी लक्ष दिल्याने कोळ नदी भरली असल्याचा दावा खिल्लारी यांनी केला आहे.
महावितरण कंपनीचे अधिकारी यांचे बाबत सर्वाधिक तक्रारी असल्याचा आरोप आ.कोल्हे यांनी केला आहे.कमी दाबाने वीज येते त्याचा उपयोग होत नाही.सहा तासही पुरेशी वीज मिळत नाही असा आरोप गौतम सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय आगवण आणि जिनिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार आदींनी केला आहे.त्यामुळे मुलांचा अभ्यास होत नाही,स्वयंपाक होत नाही.विद्युत पंपाना पाणी पुरेसे मिळत नाही.मग त्या विजेचा उपयोग काय असा सवाल उपस्थित केला आहे.टि.व्ही.बंद पडले आहे.गरजेच्या वेळी वीज देत नाही असा आरोप त्यांनी केला त्याचे जोरदार समर्थन राजेंद्र खिल्लारी यांनी जोडदारपणे केले आहे.दरम्यान दुष्काळाची बैठक थेट बिबट्यापर्यंत पोहचून टंचाई विषय बराच काळ बाजूला पडला असल्याचे दिसून आले आहे.येळी उपस्थितांचे आभार कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी स्वप्नील वाळुंज यांनी मानले आहे.



