जाहिरात-9423439946
दुष्काळ

…या पाणी योजनेचा प्रश्न आपण राज्य सरकारकडून मार्गी लावू-आ.काळेंचे आश्वासन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

संवत्सर-(शिवाजी गायकवाड)

   दुष्काळी जवळके,बहादराबाद,शहापूर आदी तीन गावांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या जवळके प्रादेशिक नळ पाणी योजनेच्या वाढीव अंदाज पत्रकास राज्य सरकारकडून मंजुरी घेऊन वीज बिलाचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यास सौर प्रकल्पाचा पाठपुरावा आपण राज्य सरकारकडे करू असे आश्वासन आ.आशुतोष काळे यांनी आज संपन्न झालेल्या एका बैठकीत एका प्रश्नाला उत्तर देताना दिले आहे.

  

जवळके येथील पाणी योजनेबाबत सरपंच सारिका विजय थोरात यांचेसह कार्यकर्त्यांनी वारंवार आवाज उठवला आहे.दीड महिन्यापूर्वी झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीत ही याबाबत चर्चा झाली होती.मात्र अद्याप त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही.परिणामी ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळत नाही.त्यामुळे रोगराई निर्माण होण्याची शक्यता आहे.त्याला तालुका प्रशासन जबाबदार राहील.

   केंद्र व राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलजीवन मिशन अभियानातील पाणी पुरवठ्याचे कोपरगाव तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची १२ तर जिल्हा परिषदेच्या ताब्यातील पाणी पुरवठा विभागाच्या अंतर्गत ५२ पैकी केवळ १३ कामे पूर्ण होऊन हस्तांतरीत झाली असून २३ कामे अंशतः बाकी असून अद्याप २९ कामे मोठ्या प्रमाणावर अपूर्ण असून या योजनेचा कोपरगाव तालुक्यात निधी अभावी फज्जा उडाला असून ठेकेदारांची देणी थकल्याने सदर योजना बासनात गुंडाळल्या असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या योजनावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले असताना आज या पार्श्वभूमीवर आज आ.आशुतोष काळे यांनी आज तालुक्याची टंचाई बैठक तब्बल दोन महिने उशिराने आज दुपारी ३.३५ वाजता आयोजित केली होती त्यावेळी जवळके येथील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जवरे यांनी,’जवळके प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे द्यावयास हवे होते.मात्र ते जिल्हा परिषदेकडे देण्यात आले आहे.त्यामुळे निधीची वानवा भासत आहे.जल शुध्दीकरण प्रकल्प अपूर्ण आहे.त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद गरजेची आहे.मात्र ठेकेदारांची बिले सरकारकडून मिळत नसल्याने ठेकेदार काम करण्यास राजी नाही.परिणामी जवळके ग्रामपंचायतीने वारंवार निवेदने देऊनही व आंदोलनाचा इशारा देऊनही काम पूर्ण होऊ शकले नाही.प्रशासनाने ठेकेदार यास दंड आकारला आहे.तरीही काम होऊ शकले नाही.त्यामुळे जवळपास तीन वर्षापासून ग्रामस्थांना अशुद्ध पाणी मिळत आहे.याबाबत जवळके येथील सरपंच सारिका विजय थोरात यांचेसह कार्यकर्त्यांनी वारंवार आवाज उठवला आहे.दीड महिन्यापूर्वी झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीत ही याबाबत चर्चा झाली होती.मात्र अद्याप त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही.परिणामी ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळत नाही.त्यामुळे रोगराई निर्माण होण्याची शक्यता आहे.आगामी काळात पावसाळ्यात येणाऱ्या रोगराईला तालुका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला आहे.

   जवळके प्रादेशिक नळ पाणी योजनेचे काम संबधित ठेकेदार करत नसल्याने साठवण तलावाची गळती होऊन शहापूर येथील लगतच्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.त्यामुळे आर्थिक तरतूद करून ही योजना मार्गी लावावी अशी मागणी केली आहे.


    दरम्यान सदर तीन गावांच्या पाणी योजनेचे २० वर्षापासून वीज बिल जवळपास २३-२४ लाख रुपयांचे थकले आहे.सदर ग्रामपंचायती वीज बिल भरण्यासाठी सक्षम नाही.परिणामी निम्मा भार जवळके ग्रामपंचायत उचलत असून त्याना ते आर्थिकदृष्ट्या अवघड जात आहे.त्यामुळे आगामी काळात विजेसाठी सौर प्रकल्प कार्यान्वित करणे गरजेचे आहे.त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करूनही नगर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता यांनी ते नामंजूर केले असल्याची बाब नानासाहेब जवरे यांनी आ.काळे यांचे निदर्शनास आणून दिले आहे.जोपर्यंत योजनेचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तालुका प्रशासनाने जवळके,शहापूर,बहादराबाद आदी तीन गावांना टँकरने शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली आहे त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बहादरपूर येथील विहिरीला पाणी नाही त्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याची तक्रार सरपंच गोपीनाथ रहाणे यांनी केली त्यास अंजनापुर येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे,कार्यकर्ते रंगनाथ गव्हाणे यांनी दुजोरा दिला आहे.

  

जवळके प्रादेशिक नळ पाणी योजनेचे काम संबधित ठेकेदार करत नसल्याने साठवण तलावाची गळती होऊन शहापूर येथील लगतच्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.त्यामुळे आर्थिक तरतूद करून ही योजना मार्गी लावावी अशी मागणी केली आहे.

   सदर प्रसंगी तहसीलदार महेश सावंत,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप,गटविकास अधिकारी संदीप दळवी,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते,तालुका पशुसंवर्धन अधिकारी श्रध्दा काटे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त शिनगर,तालुका आरोग्य अधिकारी घोलप आदींसह मोठ्या संख्येने तालुक्यातील सरपंच,ग्रामसेवक,नागरिक उपस्थित होते.

सुरेगाव येथील पिण्याच्या पाण्याची समस्या मांडताना कोपरगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मीक कोळपे दिसत आहे.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची १२ तर जिल्हा परिषदेच्या ताब्यातील पाणी पुरवठा विभागाच्या अंतर्गत ५२ पैकी केवळ १३ कामे पूर्ण होऊन हस्तांतरीत झाली असून २३ कामे अंशतः बाकी असून अद्याप २९ कामे मोठ्या प्रमाणावर अपूर्ण असून या योजनेचा कोपरगाव तालुक्यात निधी अभावी या योजनांचा अक्षम्य विलंब झाला आहे.त्यात जवळके प्रादेशिक योजना त्यात समाविष्ट असल्याबाबत हा लक्षवेध झाला होता.आता आपण याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावू.सौर योजनेसाठी निधी उपलब्ध करून देऊ.तो पर्यंत तालुका प्रशासनाने टंचाई काळात शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी असे आदेश त्यानी गटविकास अधिकारी संदीप दळवी आणि तहसीलदार महेश सावंत यांना दिले आहे.

   सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे यांनी आपण या संबंधी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून हा जवळके नळ पाणी योजनेचा निधीचा व सौर योजनेचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे.याबाबत जवळके ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

   यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी जवळके पाणी योजना अपूर्ण आहे तो पर्यंत या तिन्ही गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीचे तसा प्रस्ताव दोन दिवसाचे आत ग्रामसेवक यांनी पाठवावा आपण तो जिल्हाधिकारी यांचेकडून मंजूर करून घेऊ व शुद्ध पाणी पुरवठा करू असे आश्वासन नानासाहेब जवरे यांना शेवटी दिले आहे.

   यावेळी तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थानी आपल्या समस्या मांडण्यास आंचलगाव आणि तिळवणी पासून सुरुवात केली होती.त्यावेळी कोपरगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मीक कोळपे यांनी सुरेगाव येथे नागरिकांना पिण्यास पाणी उपलब्ध नसल्याचे सांगून पाणी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.

   दरम्यान यावेळी बहादरपूर येथील विहिरीला पाणी नाही त्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याची तक्रार सरपंच गोपीनाथ रहाणे यांनी केली त्यास अंजनापुर येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे,कार्यकर्ते रंगनाथ गव्हाणे यांनी दुजोरा दिला आहे.तर धोत्रे येथील सरपंच यांनी पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नसल्याची तक्रार केली आहे.यावेळी सदर बैठक शांततेत संपन्न झाली असून अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश आ.काळे यांनी शेवटी दिले आहे.

   सदर प्रसंगी प्रास्ताविक गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी केले त्यात त्यांनी तालुक्यातील काकडी,मल्हारवाडी, रांजणगाव देशमुख,तीळवणी,मोर्विस,अंजनापुर,शिरसगाव आदी गावांना मे सह आगामी महिन्यात पिण्याच्या पाण्याची गरज भासणार असल्याचे सांगितले आहे तर उक्कडगाव,धोंडेवाडी,मनेगाव,आदींना उद्भव विहीर उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.तर तालुक्यात एकूण ०१ लाख १२ हजार ७७२ इतके पशुधन आहे त्यात    दुग्धजन्य गाय वर्ग ६९ हजार ९९२ आहे.तर मार्च अखेर त्यांना उपलब्ध चारा हा ०३ लाख ९३ हजार १०९ मे.टन चारा उपलब्ध असल्याचे सांगून प्रतिदिन त्यांना ०१ हजार ०८५ मेट्रिक टन चारा लागत असल्याचे सांगून महिन्याला ३२ हजार ८६७ मे.टन चारा लागणार असल्याचे सांगून

   पशुधन संख्या,उपलब्ध चारा याचा आढावा सादर केला आहे.यावेळी पूर्व भागातील दुष्काळी गावांचा टंचाई आढावा घेण्यात आला आहे.तर उपस्थितांचे आभार नायब तहसीलदार प्रफुल्लीता सातपुते यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close