जलसंपदा विभाग
निळवंडे धरणाच्या वंचित गावांना पाणी मिळेना,शेतकऱ्यांनी केली चारीची पाहणी !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
निळवंडे धरणाचे लाभक्षेत्रात वंचित राहिलेल्या जवळके,धोंडेवाडी,बहादराबाद,बहादरपुर पश्चिम,सायाळे पूर्व भाग,अंजनापूर पूर्व,शहापूर,दुशिंगपूर,वारेगाव,पाथरे आदी गावांना अद्याप पाणी मिळालेले नाही.मात्र लाभक्षेत्रातील सर्वपक्षीय राजकीय नेते श्रेय घेण्यासाठी दर आठवड्याला एक बैठक घेऊन ढोल ताशे बडवत आहेत.मात्र या वंचित गावाबाबत कोणी बोलण्याची तसदी घेताना दिसून येत नाही.तसेच,कालव्याच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या गावांना आणि शेतांना पाणी मिळेल की नाही,याबद्दल शेतकरी साशंक असल्याने निळवंडे कालवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच या उपवीर्तरिकेची पाहणी करून कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान याआधी संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्र जलसंपदा विभागाने अनधिकृतपणे वगळले होते.त्याबाबत समितीच्या कार्यकर्त्यांनी जलसंपदा विभागाच्या मंत्र्याकडे व प्रशासनाकडे सातत्याने लेखी पाठपुरावा करून मार्गी लावले आहे.मात्र अद्याप ते काम सुरू झालेले नाही.त्याबाबत आगामी पंधरा दिवसात काम सुरू केले नाही तर निळवंडे कालवा कृती समिती जलसंपदा विभागाचे विरुद्ध आंदोलन करील असा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब सोनवणे व बाळासाहेब सोनवणे यांनी दिला आहे.
निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रूपेंद्र काले आणि त्यांच्या दोन जिल्ह्यातील व सात तालुक्यातील शेकडो सहकाऱ्यांनी रस्त्यावरील लढा लढवून व उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊन शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांचे मोफत विधी सहाय्य घेऊन काम पूर्ण केले आहे.वितरण व्यवस्थेचे काम प्रलंबित असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंतेचे वातावरण आहे.अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धरणाचे पाणी कालव्यांद्वारे सुटले असले,तरी अजूनही अनेक भागांत वितरण व्यवस्था आणि पोटचाऱ्यांची कामे अपूर्ण असल्यामुळे पाण्याचा थेट फायदा शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत पोहोचलेला नाही.मुख्य आणि उप-कालव्यांचे काम काही प्रमाणात पूर्ण झाले असले,तरी मुख्य कालव्यातून शेतापर्यंत पाणी नेणाऱ्या पोटचाऱ्यांची कामे अनेक गावांमध्ये संथ गतीने सुरू आहेत किंवा प्रलंबित आहेत.वितरण व्यवस्था पूर्ण होत नसल्याने ऐन दुष्काळात सोडण्यात येणारे पाणी वाया जाण्याची भीती वाढत चालली आहे.या लाभक्षेत्रातील जवळके,धोंडेवाडी,बहादराबाद,बहादरपुर पश्चिम,सायाळे पूर्व भाग,अंजनापूर पूर्व,शहापूर,दुशिंगपूर,वारेगाव,पाथरे आदी गावांना अद्याप पाणी मिळालेले नाही.मात्र लाभक्षेत्रातील सर्वपक्षीय राजकीय नेते श्रेय घेण्यासाठी दर आठवड्याला एक बैठक घेऊन ढोल ताशे बडवत आहेत.मात्र या वंचित गावाबाबत कोणी बोलण्याची तसदी घेताना दिसून येत नाही.तसेच,कालव्याच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या गावांना आणि शेतांना पाणी मिळेल की नाही,याबद्दल शेतकरी साशंक आहेत.पाणी वेळेवर उपलब्ध होईल या आशेने शेतकऱ्यांनी नगदी पिकांचे किंवा रब्बी-उन्हाळी पिकांचे नियोजन केले होते.मात्र,पाणी थेट जानेवारी -2027 मध्ये सोडण्याचे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे या मंत्र्यांनी जाहीर केल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.परिणामी प्रत्यक्ष पाणी शेतात पोहचण्यास आणि रब्बी पिके उभी करण्यात अडथळे येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान निळवंडे कालवा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच डी.वाय.04 टेल या आठ कि.मी.चारीच्या कामाची नुकतीच पाहणी केली असून त्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.याबाबत निळवंडे कालवा कृती समिती सातत्याने लेखी पाठपुरावा करत असून यात राजणगाव देशमुख येथील व्हॉल्व,खोकड विहीर येथील नदी जोड,अंजनापूर पाझर तलाव ते मंगलमूर्ती कार्यालय,बोडखे वाडी या ठिकाणी पूर पाण्याचे काम होण्यासाठी प्रयत्न करत आहे.मात्र याबाबत सरकारी पातळीवरून अनास्था दिसून येत आहे.त्याबाबत शेवटचा निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे समितीच्या कार्यकर्त्यांत बोलले जात आहे.त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करून पुढील निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार नुकतीच वितरण व्यवस्थेची पाहणी समितीचे कार्यकर्त्यांनी केली आहे.त्यात खोकड विहीर येथून जाणारी डी.वाय.04 पुन्छ (टेल) वितरण व्यवस्थेचे काम सात वेगवेगळ्या ठिकाणी अवजड मशीन लागून वेगाने सुरू असल्याचे दिसून आले आहे.यातील जवळपास आठ किमीतील जवळपास साडेपाच सहा कि.मी.काम होत आले आहे.मात्र तळेगाव दिघे शिवारातील कालवा पूंछ येथून सुरू होणारे 100 ते 150 मीटर काम मात्र सुरू झालेले आढळले नाही.त्याबाबत समितीच्या कार्यकर्त्यांनी जबाबदार अधिकाऱ्यांना तातडीने दूरध्वनी करून सदर काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.त्याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवली असल्याचे दुष्काळी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

दरम्यान याआधी संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्र जलसंपदा विभागाने अनधिकृतपणे वगळले होते.त्याबाबत समितीच्या कार्यकर्त्यांनी जलसंपदा विभागाच्या राधाकृष्ण विखे या मंत्र्याकडे व प्रशासनाकडे सातत्याने लेखी पाठपुरावा करून मार्गी लावले आहे.मात्र अद्याप ते काम सुरू झालेले नाही.त्याबाबत आगामी पंधरा दिवसात काम सुरू केले नाही तर निळवंडे कालवा कृती समिती जलसंपदा विभागाचे विरुद्ध आंदोलन करील असा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब सोनवणे व बाळासाहेब सोनवणे यांनी दिला आहे.

सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,ज्येष्ठ कार्यकर्ते साहेबराव रहाणे,तानाजी शिंदे सर,सुधाकर शिंदे,धन्यदेव शिंदे गुरुजी,भाऊसाहेब सोनवणे,बाळासाहेब सोनवणे,सुभाष सोनवणे आदीसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.



