पुरस्कार,गौरव
…या शिक्षकास शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
रायझिंग ट्रायबल फाऊंडेशन व महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शिक्षक संघटना यांचे वतीने दिला जाणारा जिल्हास्तरिय शिक्षक गौरव पुरस्कार-२०२५ हा राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील स्व.रावसाहेब कोंडाजी साबळे पा.माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब नामदेव थोरात यांना देण्यात आला आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दरम्यान पुरस्कार प्राप्त शिक्षक बाळासाहेब थोरात हे मूळचे कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील रहिवासी असून त्यांचे व त्यांचे कुटुंबाचे जवळके आणि परिसरातातील सामाजिक कार्यात मोठे योगदान आहे.त्यांच्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अहिल्यानगर येथील रायझिंग ट्रायबल फाऊंडेशन व राज्य स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांना पुरस्कार जाहीर केले जातात.या वर्षी हा कार्यक्रम राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर येथील हॉटेल यश ग्रँड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब थोरात यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षण विभागाचे सह संचालक रमाकांत काठमोरे हे होते.
सदर प्रसंगी जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे माजी शिक्षणाधिकारी दिलीप थोरे,प्राथमिकचे वेतन अधीक्षक हेमंत साळुंखे,नगर महानगर पालिकेचे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण,स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे संस्थापक के.पी.पाटील,यांचेसह नगर महानगर पालिकेचे माजी नगरसेवक योगीराज गाडे,साईदिप हॉस्पिटलचे डॉ.सय्यद,स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे,श्रीगोंदा तालुकाध्यक्ष देवराम दरेकर , देविदास खेडकर,रवींद्र भोंडवे,बाळासाहेब चांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान पुरस्कार प्राप्त शिक्षक बाळासाहेब थोरात हे मूळचे कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील रहिवासी असून त्यांचे व त्यांचे कुटुंबाचे जवळके आणि परिसरातातील सामाजिक कार्यात मोठे योगदान आहे.त्यांच्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र साबळे,मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे,संस्थेचे मुख्याध्यापक गागरे,विश्वस्त,शिक्षक यांचेसह निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रूपेंद्र काले,सेवानिवृत उपअभियंता एस.के.थोरात,जवळके ग्रामपंचायतचे माजी सरपंच वसंत थोरात,सरपंच सारिका विजय थोरात,गोदरेजचे उपव्व्यवस्थापक अमोल थोरातमाजी उपसरपंच डी.के.थोरात,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात आदींनी अभिनंदन केले आहे.