जयंती,पुण्यतिथी अभिवादन
महात्मा बसवेश्वर जयंती…या गावात उत्साहात साजरी

न्यूजसेवा
कुंभारी-(प्रतिनिधी)
कुंभारी येथे देखील जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या ठिकाणी देखील आ.आशुतोष काळे यांनी उपस्थित राहून महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करून समाजबांधवांना मार्गदर्शन केले आहे.
‘मानवाचं धार्मिक जीवन हे त्याच्या सामाजिक कल्याणाशी जोडलं गेलेलं असतं त्यामुळे बसवण्णांनी धार्मिक सुधारणांबरोबरच सामाजिक सुधारणांना महत्त्व दिलं होतं हे आपल्याला दिसून येते.
लिंगायत धर्म हा बाराव्या शतकात स्थापन झाला आहे.या धर्माचे संस्थापक ‘बसवेश्वर’ यांच्या साधी राहणी आणि उच्चविचारसरणीमुळेच हा धर्म लोकप्रिय झाला असे मानले जाते.वैदिक धर्मव्यवस्थेला आव्हान म्हणूनच लिंगायत धर्म समोर आला होता.सर्वांना समान अधिकार हा या धर्माचा मूल आधार आहे.महात्मा बसवेश्वरांनी महिलांना समान हक्क दिले होते.त्याचबरोबर महिला ‘स्कॉलरशिप’ किंवा धर्माचं विशेष ज्ञान असलेल्या महिलांची मोठी परंपरा लिंगायतांना लाभलेली आहे असे मानले जाते.हा धर्म हिंदूंचे सर्व सण उत्सव मानतो.त्यांची जयंती भारतात सर्वत्र साजरी केली जाते.कुंभारी येथेही ती उत्साहात संपन्न झाली आहे.
सदर प्रसंगी परमपूज्य ह.भ.प.उंडे महाराज,गोपिनाथ निळकंठ,शरद निळकंठ,उपसरपंच दिगंबर बढे,ललित निळकंठ,सतीश कदम,अण्णासाहेब बढे,सोपान चिने,सुभाष बढे,गणेश निळकंठ,दिलीप ठाणगे,श्रीकांत पैठणे आदी मान्यवर उपस्थित होते.