जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

लिंगायत समाजाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार-आश्वासन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

श्रमाला ईश्वर मानणारा लिंगायत समाज नेहमी सोबत राहिला आहे.त्यामुळे त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करणे हे माझे कर्तव्य असून लिंगायत समाजाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केले.

“आ.काळे यांनी सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना समान न्याय देवून सर्वधर्म समभाव जपला आहे.त्यांनी सर्व मोठ्या संख्येने असलेल्या समाजाबरोबरच समाजातील अल्पसंख्यांक नागरिकांना देखील तेवढेच महत्व दिले आहे.आमच्या समाजाला देखील त्यांनी न मागता १० लक्ष रुपये निधी सभामंडपासाठी दिला आहे”-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष राज्य सहकारी पससंस्था फेडरेशन.

मानवतेची शिकवण देणाऱ्या जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आ. काळे यांनी समतानगर सर्वे नं.१९८ मध्ये दिलेल्या १० लक्ष रुपये निधीतून लिंगायत समाजासाठी बांधण्यात येणाऱ्या सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे हे होते.

सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी नगरसेवक विरेन बोरावके,मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे,प्रदीप साखरे,दिनकर खरे,मायादेवी खरे,विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार,नगरपरिषद अभियंता सुनील जाधव,अमोल राजूरकर,गिरीश सोलेकर,संदीप सावतडकर,संतोष चवंडके,राजेंद्र सावतडकर,गोपीनाथ निळकंठ,सतीश निळकंठ,वाल्मिक निळकंठ,ललित निळकंठ,गणेश निळकंठ आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

सदर प्रसंगी अमोल राजूरकर यांनी प्रसात्विक केले तर सूत्रसंचालन गिरीश सोलेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार संदीप सावतडकर यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close