जयंती,पुण्यतिथी अभिवादन
कोपरगाव तालुक्यात संत गाडगेबाबा जयंती साजरी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील तीळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सदगुरु संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय तिळवणी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत गाडगे बाबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
“देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका,सावकाराचे कर्ज काढू नका,अडाणी राहू नका,पोथी-पुराणे,मंत्र-तंत्र, देवदेवस्की,चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका” अशी शिकवण संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर लोकांना दिली त्यांची जयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते तशी ती तीळवणी येथील जिल्हा परिषद शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
गाडगे महाराज हे गोरगरीब,दीनदलित यांच्यामधील अज्ञान,अंधश्रद्धा,अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते.तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी” असे सांगत दीन,दुबळे,अनाथ,अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा.”देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका,सावकाराचे कर्ज काढू नका,अडाणी राहू नका,पोथी-पुराणे,मंत्र-तंत्र, देवदेवस्की,चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका” अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली त्यांची जयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते तशी ती तीळवणी येथील जिल्हा परिषद शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक बापू हजारे,सामजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पगारे,वाचनालयाचे अध्यक्ष विष्णू वाघ,पंचायत समिती कोपरगावचे विशेष शिक्षक सचिन म्हस्के, शिक्षक लक्ष्मण पंडोरे,संदिप नंदेश्वर,बंडू राठोड,अशोक राहाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
गाडगेबाबा यांच्या जीवनावर विद्यार्थ्यानी आणि शिक्षकांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संदिप नंदेश्वर तर उपस्थितांचे आभार अशोक रहाणे यांनी मानले आहे.