जयंती,पुण्यतिथी अभिवादन
कोपरगावात संत गाडगेबाबा यांचा पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत नुकतीच संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात साजरी करण्यात आला आहे.
“विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे,त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे
संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते.त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जाणोरकर,तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते.गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते”-कैलास ठोळे,अध्यक्ष,श्रीमान गोकूळचंद विद्यालय कोपरगाव.
संत गाडगे बाबा हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार,संत आणि समाजसुधारक होते.त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत.गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती.त्यांनी दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले होते.त्यांचे कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे.आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते कठोर टीका करत.समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत असत.त्याची पुण्यतिथी कोपरगाव शहरासह राज्यभर उत्साहात संपन्न झाली आहे.
या प्रसंगी श्री.गो.विदयालयात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.विदयालयाचे पर्यवेक्षक आर.बी.गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन डी.व्ही.विरकर केले आहे.
या कार्यक्रमाला विदयालयाचे जेष्ठ शिक्षक डी.व्ही.तुपसैंदर,आर.जे.चौधरी,ए.जे.कोताडे,डी. पी.कुडके,शैलेश गाडेकर,ए.बी.अमृतकर,एस.डी.डांगे,वाय.के.गवळे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन केले आहे.