शैक्षणिक
विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्री न बनता शिकता शिकता संशोधनाकडे वळले पाहिजे-प्रा.डॉ.भोसले
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमानात विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्री न बनता शिकता शिकता संशोधनाकडे वळले पाहिजे.उच्च शिक्षणात संशोधनाशिवाय उज्वल भवितव्य नसल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे विज्ञान शाखा प्रमुख डॉ.बी.बी.भोसले यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“विद्यार्थ्यांनी आपापल्या अभ्यासक्रमाबरोबरच आपल्यातील संशोधन क्षमता ओळखून त्यास वाव देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये (स्टार्टअप अँड इन्होवेशन) मोठया संख्येने सहभाग घेणे ही काळाची गरज आहे.आज जागतिक पातळीवर शिक्षण क्षेत्रात संशोधनाला महत्व प्राप्त झाले आहे”-डॉ.बी.एस.यादव,प्राचार्य,के.जे.सोमैया महाविद्यालय कोपरगाव.
कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयात आय-टू-ई (इन्होवेशन टू एंटरप्राईज) स्पर्धा नुकत्याच मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या आहे.त्या वेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कलाशाखा प्रमुख प्रो.डॉ.के.एल.गिरमकर,डॉ.एस.आर.पगारे,स्टार्टअप अँड इन्होवेशन सेलचे समन्वयक डॉ.एस.जी.कॉडा,प्राध्यापक,विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टार्टअप अँड इन्होवेशन सेलचे समन्वयक डॉ.एस.जी.कॉडा यांनी तर कलाशाखा प्रमुख प्रो.डॉ.के.एल.गिरमकर,प्रो.डॉ.एस.आर.पगारे,स्टार्टअप अँड इन्होवेशन सेलचे प्रमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.
या स्पर्धेमध्ये एकूण १२ संघांनी आपापले संशोधन प्रकल्प सादर केले आहे.त्यातून लक्षवेधी दोन प्रकल्पांची निवड करून विद्यापीठात पाठविण्यात आले.या स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद दिसून आला आहे.स्पर्धेत सादर प्रोजेक्ट प्राधान्याने व्यावसायाभिमुख होते हि समाधानाची बाब होती.
सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी डॉ.जी.के.चव्हाण व प्रा.पी.जी.गुडघे यांचे सहकार्य लाभले.उद्घाटन सत्राचे सूत्रसंचलन प्रा.एन.एस.पोटे यांनी केले तर प्रा.ए.डी.पवार यांनी उस्थितांचे आभार मानले.