जगावेगळा हरींनाम सप्ताह
… यां नेत्याकडून महंत रामगिरीजी महाराज यांची पाद्यपूजा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र कोकमठाण येथे सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांचा १७५ व्या अखंड हरीनाम सप्ताह सोहळ्यामध्ये श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी सपत्नीक महंत रामगिरी महाराज यांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहे.
देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्री सद्गुरू गंगागीरीजी महाराज यांच्या,”शतकोत्तर अमृत महोत्सवी अखंड हरींनाम सप्ताह’ कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र कोकमठाण येथे आज नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते नुकताच संपन्न झाला आहे.त्याचा प्रत्यक्ष लाभ तिसऱ्या दिवशीही लाखो भाविकानी घेतला आहे.त्यावेळी आ.काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरणारे,माजी उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,उपाध्यक्ष संभाजीराव रक्ताटे,सदस्य महेश लोंढे,विजय थोरात,विजय रक्ताटे,उपसरपंच दीपक रोहोम,सुनील लोंढे,विजय रक्ताटे आदी मान्यवर उपस्थित होते.